Friday, April 26, 2024

सीझनची पहिली कॅप्टन बनली शमिता शेट्टी, निशांत भट्ट अन् प्रतीक सेहजपालला धूळ चाखवत मिळवला विजय

टेलिव्हिजनचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ च्या घरात अगदी सुरुवातीपासूनच वाद पाहायला मिळत आहेत. यावेळी जंगल थीमवर आधारित बिग बॉसचं घर दोन भागांमध्ये विभागलं गेलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चे स्पर्धक निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सेहजपाल हे मुख्य घरात राहतात. तर इतर सर्व सदस्य जंगलवासीयांसारखे जंगलात राहत आहेत. दरम्यान आजकाल प्रतीकमुळे घराचे वातावरण खूप तापलेले दिसत आहे. तर याच दरम्यान बिग बॉसने या सीझनच्या पहिल्या कॅप्टन निवडीसाठी घरच्यांना टास्क दिले.

बिग बॉसने टास्कसाठी घरच्यांना पत्र पाठवले. ज्यात लिहिले होते की, सीझनचा पहिला कॅप्टन होण्यासाठी शमिता शेट्टी, प्रतीक सेहजपाल आणि निशांत भट्ट यांच्यात स्पर्धा होईल. मात्र, या स्पर्धेत जंगलवासीयांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. बिग बॉसने आपल्या पत्रात सांगितले की, घराचा कॅप्टन बनवण्याचा अधिकार जंगलवासीयांच्या हातात असेल. (bigg boss 15 shamita shetty became the first captain of this season by defeating prateek sahajpal and nishant bhatt)

या टास्कमध्ये बिग बॉसने सांगितले की, घरामध्ये भुकेला लांडगा घरात फिरत आहे, ज्यासाठी बिग बॉसने काही चिकन पाठवले आहे. या सहा कोंबड्यांपैकी प्रत्येकी २-२ वर प्रतीक, शमिता आणि निशांत यांची नावे लिहिली होती. कार्यानुसार, ज्या स्पर्धकाला जंगलाच्या कॅप्टनच्या शर्यतीतून बाहेर काढायचे आहे, त्याच्या नावाची कोंबडी लांडग्याच्या तोंडात टाकावी लागेल.

जंगलवासीयांनी अगोदरच घराची कॅप्टन म्हणून शमिता शेट्टीची निवड केली होती. या अंतर्गत, बनवलेल्या रणनीतीनुसार जंगलातील स्पर्धकांनी निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्या नावाच्या कोंबड्या एक एक करून लांडग्याला खाऊ घातल्या आणि शेवटी शमिता शेट्टी या सीझनची पहिली कॅप्टन बनली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा