‘बिग बॉस १५’चा स्पर्धक उमर रियाझ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. मग सिम्बा नागपालसोबतची त्याची लढाई असो, स्विमिंग पूलमध्ये ढकलणे असो किंवा त्याचे कॅप्टन बनणे असो. दिसायला हँडसम असणाऱ्या उमरला त्याच्या चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत आहे.
अनेक सेलिब्रिटी देखील उमरच्या बाजूने आहेत आणि त्याच्या खेळाचे कौतुक करत आहेत. या सगळ्यामध्ये उमर त्याच्या ‘बिग बॉस ११’ची स्पर्धक सबा खानसोबतच्या लिंक-अप अफवांमुळे देखील चर्चेत आहे. मात्र उमरच्या बहिणीने या सर्व अफवा चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. (bigg boss 15 umar riaz sister reveal whether he is dating saba khan or not)
उमरची बहीण महविश म्हणाली, “सर्वप्रथम मला हे पाहून अभिमान वाटतो की उमर आपल्या सर्वांना अभिमानास्पद वाटू लागला आहे. दुसरे म्हणजे, उमर सबा खानला डेट करत असल्याच्या अफवा अजिबात खऱ्या नाहीत. जेव्हा आम्ही याबद्दल वाचले तेव्हा ते खरोखर मजेदार होते. मला, आमच्या पालकांचा फोन आला आणि त्यांनाही या बातमीने धक्का बसला. या सर्व फालतू अफवा आणि बातम्या आहेत, उमर कुणालाही डेट करत नाही आणि सिंगल आहे.”
महविशने सांगितले की, “सबा ही केवळ उमरची सहकलाकार आहे. सबाने उमरसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. उमरने असेही स्पष्ट केले आहे की, तो घरात कोणीतरी शोधू शकतो, ज्याच्याशी तो कनेक्ट होऊ शकेल. सबा एक प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि हो माझे आई-वडील आणि माझा भाऊ नोमान सबाला योगायोगाने एका मॉलमध्ये भेटले होते. पण ती केवळ उमरची सहकलाकार आहे.”
उमरला पाठिंबा देणाऱ्यांबद्दल मेहविश पुढे म्हणाली, “या प्रवासात उमरला पाठिंबा देणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. पण अशा खोट्या अफवांना आपण हवा देऊ नये.”
तर दुसरीकडे, उमर यावेळी घराचा कॅप्टन आहे. गेल्या आठवड्यात एका टास्कदरम्यान उमरचे सिम्बा नागपालशी भांडण झाले, ज्यामध्ये सिम्बाने त्याला स्विमिंग पूलमध्ये ढकलले. याप्रकरणी सलमान खानने सिंबाला इशाराही दिला होता. यासाठी त्याने सिंबाला केवळ फटकारले नाही तर शिक्षाही केली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल
-आसिम रियाज घेऊन येतोय त्याचं स्वत:चं ‘बिग बॉस’, दमदार टीझर रिलीझ करून चाहत्यांना दिली माहिती