अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे आपल्या इंडस्ट्रीव्यतिरिक्त इतर इंडस्ट्रीमध्येही प्रसिद्ध असतात. त्यातीलच एक म्हणजे पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना. हिमाशी केवळ पंजाबमध्येच नाही, तर बॉलिवूडमध्येही चांगलीच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे रियॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ नंतर ती घराघरात पोहोचली. ती पंजाबी इंडस्ट्रीमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. हिमांशी आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिमांशीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ‘उमराव जान’ चित्रपटातील ‘सलाम’ या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे.
खरं तर हे गाणे तिने पुन्हा तयार केले आहे. इतकेच नाही, तर ती या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याच्या अवतारात दिसत आहे. तपकिरी रंगाच्या सूटमध्ये हिमांशी हेवी मेकअपसोबत दिसत आहे.
तिच्या या लूकने चाहत्यांनाही भूरळ घातली आहे. दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री आरती सिंग हिनेही हिमांशी खुरानाच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. आरती सिंगने लिहिले की, “खूपच सुंदर दिसत आहात हिमांशीजी.”
हिमांशीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिला इंस्टाग्रामवर ८ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. नुकतेच ती आपल्या ‘सुरमा बोले’ गाण्यामुळे चर्चेत आली होती. तिने आपल्या चाहत्यांनाही सुरमा बोले चॅलेंज दिले होते.
हिमांशी ‘बिग बॉस १३’मध्ये आल्यानंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये चांगली वाढ झाली. शोमधून बाहेर आल्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर मिळू लागल्या.
हिमांशीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला जॉन अब्राहमच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु तिने ही ऑफर नाकारली होती. सन २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘परमाणू’ चित्रपटात तिला जॉनच्या पत्नीच्या भूमिकेत काम करायचे होते. परंतु तिने याला नकार दिला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ