बिग बॉस 16 फेम आणि अवघ्या भारताचा लाडका अब्दू रोजिकची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. तजाकिस्तान मधून आलेल्या अब्दुने आपल्या प्रेमळ स्वाभावाने भारतासोबतच बिग बॉसच्या घरामधील अनेकांची मानं जिंकली. त्याशिवाय साजिद खान आणि अब्दुचं एक वेगळंच नातं पाहायला मिळालं. बिग बॉसमुळे अब्दुला अमाप प्रसिद्ध सोबतच ‘छोटा भाईजान’ हे नाव देखिल मिळालं. सध्या भारतभर शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच अब्दुच्या मनातही पठाची क्रेज निर्माण झाली आहे. त्यामुळे शाहरुखला भेटण्यासाठी त्याने थेट मन्नतच गाठलं आहे.
सध्या सर्वत्र शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर पठाण (Pathan) चित्रपटाची क्रेज पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी पठाण चित्रपटाला डोक्यावर घेतलं असून मोठा पडदा व्यापून घेताला आहे. अशातच अब्दू रोजिक (Abdu Rozik) च्या मनातही पठाणची क्रेज निर्माण झाली असून तो शाहरुखची भेट घेण्यासाठी थेट मन्नतपशी पोहोचाल आहे. तो देखिल सामान्य फॅनसारखं बंगल्याच्या बाहेर शाहरुखच्या दर्शनासाठी उभा झाला आहे, तेव्हा मन्नत बाहेर अब्दुची चाहत्यांप्रती क्रेज पाहायला मिळत आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुरुवार (दि, 26 नोव्हेंबर) रोजी अब्दु रोजिक शाहरुखला भेटण्यासाठी थेट मन्ननतच्या बाहेर येऊन थांबला होता. शाहरुख सोबत भेटचण्याची संधी मिळण्याच्या आशेने कारच्या सनरुफमधून अब्दुने हजेरी लावली होती. त्यावेळी त्येन गळ्यामध्ये एक पाटी अडकवली होती, ज्यावर हिले होते की, “मी तुला भेटल्याशिवाय माझी इच्छा पूर्ण होणार नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शाहरुख खान. तुझ्या सर्व चाहत्यांसोबत इथे बसून मी तुला कधी भेटणार याची वाट पाहण्यासाठी खूप आनंद होत आहे. आता हीच इच्छा बाकी आहे पठाण.”
View this post on Instagram
अब्दू थेट शाहरुखची भेट घेऊ शकत होता मात्र, त्याने चाहत्यांमध्ये उभा राहून शाहरुखची मुलाखत घेण्याची संधी मिळवली. अशा साध्या स्वाभवानेच अब्दुने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याशिवाय शाहरुखच्या फ्रन्सदेखील अब्दुवर प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यासोबतच अब्दुसोबत सेल्फी काढण्यासाठी देखिल चाहत्यांची गर्दी लावली होती. पॅपरीझींना बोलत असताान अब्दू म्हणाला की, “मला शाहरुख खान खुप आवडतो” व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अब्दूने काळ्या रंगाचे जॅकिट, टी-शर्ट आणि पॅन्ट असा हटके पेहराव परिधान केला होता. अब्दूची वेशभूषा सुद्धा विशेष लक्ष वेधून घेत होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भारतीयन्स’ सिनेमामध्ये गाणं गाताना दिसणार ‘ही’ प्रसिद्ध गायिका, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
बॉबी देओलवर झाला अनप्रोफेशनल असल्याचा आरोप, अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया