Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड बॉबी देओलवर झाला अनप्रोफेशनल असल्याचा आरोप, अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉबी देओलवर झाला अनप्रोफेशनल असल्याचा आरोप, अभिनेत्याने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिनेता बॉबी देओलने (Boby Deol) आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. सुरुवातीच्या अपयशानंतर बॉबी देओल खूपच अस्वस्थ झाला होता. या काळात तो डिप्रेशनचा शिकार झाल्याचेही बोलण्यात आले होते. त्यानंतर त्याला सलमान खानने ‘रेस 3’ या चित्रपटातून दुसरी संधी दिली, त्यानंतर बॉबी देओलने मागे वळून पाहिले नाही.अपयशाचं दुःख पचवल्यानंतर आता बॉबी देओलची अभिनय कारकिर्द पून्हा रुळावर आली आहे. एका मुलाखतीत बॉबी देओलने सांगितले होते की “एकदा त्याच्यावर कामचुकार असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तो विश्वसनीय कलाकार नसल्याचेही” सांगण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलने स्वत:वरील या आरोपांबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

या आरोपांचे खंडण करताना बॉबी देओलने सांगितले की, “विनाकारण असे आरोप केले गेले. मी कधीही शूट रद्द केले नाही किंवा कधीही सेटवर उशिरा पोहोचलेलो नाही. माझ्यावर कोणताही आधार नसताना कामचुकार असल्याचा आरोप करण्यात आला. माझ्याबद्दल काहीही खोटे पसरवले गेले आणि मला आश्चर्य वाटू लागले की, “मी माझ्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात असताना लोक अशा गोष्टी का बोलत आहेत.” बॉबीला खूप दिवसांपासून चित्रपटात काम मिळाले नाही म्हणून तो डीजे बनला आणि पबमध्ये काम करू लागला.

दरम्यान बॉबीने ‘धरमवीर’ चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने ‘बरसात’ या चित्रपटातून त्याने नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटातील त्याच्या चमकदार कामासाठी सर्वोत्कृष्ट नायक म्हणून पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. बॉबी देओलने ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘दिल्लगी’, ‘बादल’, ‘बिछू’ आणि ‘यमला पगला दिवाना’A यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. दिवाना (2011) चित्रपटांमध्ये काम केले.अलिकडेच त्याची आश्रम वेबसिरीज प्रचंड गाजली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी मौनी रॉय, पहिल्याच भेटीत सुरज नांबियरवर झाली होती फिदा
Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलली ईशा गुप्ता; म्हणाली, ‘मी तर दहा…’

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा