Friday, July 5, 2024

काय सांगता! ‘मिस बिकिनी’ बनलेली अर्चना ‘बिग बॉस’मध्ये लावणार ग्लॅमरचा तडका?

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे ‘बिग बाॅस’ होय. यावेळी ‘बिग बॉस 16‘ मध्ये अभिनेते, गायक,  ते राजकारणी पाहायला मिळत आहेत. बिग बॉसची ग्लॅमरस स्पर्धक अर्चना गौतम अभिनेत्री आणि मॉडेलसोबतच नेता  देखील आहे. अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिला साऊथची ‘सनी लिओन’ असेही म्हणतात. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.

बिग बॉसची ही स्पर्धक आहे राजकारणी
अर्चना गौतम(Archana Gautam) बिग बॉसमध्ये पहिल्या दिवसापासून आपले नाणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. शोच्या लॉन्चिंगच्या दिवशी तिने सलमान खान (Salman Khan) साेबत बोलताना सांगितले की, “तिला बिग बॉसच्या घरात एक खास ओळख बनवायची आहे, कारण तिला राजकारणात पुढे जायचे आहे.”

अर्चना गौतम ही उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी आहे. तिचा जन्म 1 सप्टेंबर 1995 रोजी मेरठमध्येच झाला. बिग बॉस 16 ची स्पर्धक आणि अभिनेत्री अर्चना गौतम हिने यूपीमधून आमदारकीची निवडणूक लढवली आहे. अर्चनाला काँग्रेसने मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट दिले होते. मात्र, अर्चना यांना निवडणूक जिंकता आली नाही. अर्चना राज राजकारणाची पहिली शिडी चढण्यात अयशस्वी ठरली असेल, पण तिचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. बिग बॉसमध्ये छाप पाडून तिला राजकारणात पुढे जायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

याव्यतिरिक्त अर्चना गौतमही बिकिनी मॉडेल देखील आहे. ती ‘बिकिनी गर्ल’ म्हणून ओळखली जाते. अर्चना ‘मिस बिकिनी इंडिया 2018’ची विजेती आहे. याशिवाय तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. अर्चनाचे इन्स्टाग्रामवर 752K फॉलोअर्स आहेत.अर्चनाला नृत्याचीही खूप आवड आहे. अर्चनाचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉसमध्येही ती अनेक गाण्यांवर डान्सकरताना दिसते.

अर्चनाने या चित्रपटांमध्ये केले आहे काम
अर्चनाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. ही अभिनेत्री पहिल्यांदा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर अर्चना ‘हसिना पारकर’, ‘बारात कंपनी’, ‘जंक्शन वाराणसी’मध्येही दिसली. अर्चनाने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, अर्चनाला ती ओळख मिळाली नाही जी अभिनेत्री म्हणून प्रत्येकाची इच्छा असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

सध्या अर्चना बिग बॉस 16 मध्ये धमाल करत आहे. बाकी स्पर्धकांशी ती उघडपणे पंगा घेत आहे. पहिल्याच दिवशी घरातील अर्धे सदस्य अर्चनाच्या विरोधात गेले हाेते, जेव्हा अर्चनाने शोच्या सुरुवातीलाच घरातील सदस्यांना थक्क केले आहे, तेव्हा ती शोमध्ये किती धमाल करेल याचा विचार करण्यासारखा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! चाहत्याने ठेवला अभिनेत्रीच्या खांद्यावर हात अन् शेहनाज चिडून म्हणाली, ‘मैत्रीण समजला…’

‘पाचशेत काय काय करू’, म्हणत खेसारीने अभिनेत्रीलाच विचारला प्रश्न; भोजपुरी गाण्याची रंगलीये तुफान चर्चा

हे देखील वाचा