Tuesday, July 9, 2024

बिग बॉस फेम अंकित गुप्तालाही कारावा लागला होता ‘कास्टिंग काउच’चा सामना, वाचा ‘तो’ धक्कादायक किस्सा

मनोरंजन विशावसारख्या झगमगणाऱ्या दुनियेत ‘बॉडी शेमिंग’ आणि ‘कास्टिंग काऊच’ या सगळ्या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. बॉलिवूड असो किंवा टीव्ही क्षेत्र असो ग्लॅमरसच्या दुनियेत काम मिळण्यासाठी अनेकांना या गोष्टींचा सामोरे जावं लागतंच. मात्र,या कास्टिंग काउचचा सामना फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना देखिल करावा लागतो. असांच काही प्रकार ‘बिग बॉस‘ फेम अभिनेता अंकित गुप्ता याच्या सोबतही घडला आहे

कलर्स टीव्ही वरील प्रसिद्धा मालिका ‘उडारिया'(Udaariyaan) फेम ‘फतेह’ म्हणजेच अंकित गुप्ता (Ankit Gupta) हा नुकतंच बिग बॉस 16 (Bigg Boss) चा भाग होता. घरामध्ये अंकित आणि अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी यांच्या जोडीला  प्रेक्षकांप्रती खूप प्रतिसादही मिळाला होता मात्र, काही दिवसानंतर अंकित घराबाहेर पडला. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान इंडसट्रीमधील कास्टिंगकाउच विषयावर भाष्य केलं आहे. त्याशिवा त्याने त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रकारही सांगितला आहे.

अंकितने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये त्याला काही लोकांनी खूप विचित्र सल्ले दिले होते. तो सल्ला खूपच धक्कादायक होता त्याशिवाय अंकितला स्वात: सांगतानीही लाज वाटत होती. अंकित म्हणाला की, “इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यासाठी खूप तडजोड करावी लागते. अनेक लोक होते की, ज्यांना वाटत होतं मी पण तडजोड करावी, ते सांगायचे की अकिंत असंच काम मिळत नाही इथे, आम्ही खूप लोकांना लॉंच केलं आहे. पण त्यासाठी तडजोड करावीच लागते.”

 

View this post on Instagram

 

अंकितने पुढे सांगितले की, जी लोकं मला अशाप्रकारचे सल्ले द्याचे त्यांच्या मते त्यांनी अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी त्यांनी लॉंच केलं आहे. त्यांनीही तडजोड केली आहे त्यामुळे आज त्या ठिकाणी आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी तडजोड केली आहे. त्याशिवाय अंकितने त्याच्यासोबत घडलेला धक्कदायक किस्सा सागंत म्हणला की, “एका व्यक्तीने त्याच्याकडे त्याच्या प्रइव्हेट पार्टला स्पर्श करण्याची परवानगी मागितली होती. याचा खुलासा करत अंकित म्हणाला, मी असा गोष्टी करण्यास नकार दिला मात्र, तरीही त्यातील एका व्यक्तीने माझ्याकडून अशा गोष्टीची मागणी केली की मला स्वत:लाच कळेना की मी काय करु. ते म्हणाले की, ठीक आहे तुला तडजोड नाही करायची तर ठीक आहे पण कमीत कमी मला एकदा त्याला (प्रायव्हेट पार्ट) स्पर्श करु दे. वरुन का असेना, त्याचं बोलणं एकून मला धक्काच बसला माझ्यासोबत काय घडतंय हे मलाच कळेना.”

अंकित गुप्ताच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर तो लवकर कलर्स टीव्ही वारील नवीन मालिका जुनुनियतमध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तो त्याच्या कृतीतून बोलला’, म्हणत दिग्दर्शक अनुराग कश्यपने केले शाहरुख खानचे कौतुक
‘देशानी फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्रींनाच…’, कंगनाच्या पठाण चित्रपटाबाबत ट्वीटवर उर्फीचं प्रतिउत्तर; म्हणाली, ‘हिंदू…’

हे देखील वाचा