Monday, June 17, 2024

‘बिग बॉस 16’ मधील पहिल्या स्पर्धकाचं नाव अखेर ठरलं, ‘या’ अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

हिंदी बिगबॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. कार्यक्रमातील या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आत्तापर्यंतचे सगळेच सीझन चांगलेच लोकप्रिय ठरले आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असतो. आतापासूनच प्रेक्षकांंना या कार्यक्रमाच्या पुढच्या सिझनची जोरदार उत्सुकता लागली आहे. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता लक्षात घेत कार्यक्रमाच्या आयोजकांनीही पहिल्या स्पर्धकाचे नाव घोषित केले आहे. 

‘बिग बॉस’ या वादग्रस्त आणि लोकप्रिय टीव्ही शोबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. गेल्या सीझनच्या यशानंतर, निर्माते आता नवीन सीझन आणखी धमाकेदार बनवण्याच्या तयारीत आहेत, ज्यासाठी ते बिग बॉसच्या 16 व्या सीझनशी अनेक मोठी आणि वादग्रस्त नावे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या यादीत वादांच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे नाव जोडले गेले आहे.

नुकत्याच संपलेल्या लॉक अपशोमध्ये त्याच्या अप्रतिम खेळीमुळे मुनव्वर फारुकी शोचा विजेता ठरला. या कार्यक्रमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शोच्या निर्मात्या एकता कपूरनेही लॉकअपमधील मुनावरच्या रणनीतीचे कौतुक केले होते. यानंतर आता तो स्टंटवर आधारित रिअलिटी शो खतरों के खिलाडीमध्येही सहभागी होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण काही कारणांमुळे तो शोसाठी केपटाऊनला जाऊ शकला नाही. यानंतर मुनावरची लोकप्रियता पाहता तो बिग बॉसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता टेली चेकरच्या रिपोर्टनुसार, मुनव्वरला बिग बॉस 16 साठी कन्फर्म केले गेले आहे आणि यासह तो या सीझनचा पहिला कन्फर्म केलेला स्पर्धक बनला आहे.

अलीकडे, बिग बॉस 16 च्या तारखेच्या संदर्भात अनेक अफवा देखील ऐकल्या होत्या. ज्यामध्ये शो या वर्षी उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आले होते, परंतु नंतर असे सांगण्यात आले की शो त्याच्या निर्धारित वेळेत म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. यावेळी मुनवर फारुकी व्यतिरिक्त शोमध्ये अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, शिवांगी जोशी, फैजल शेख, जन्नत जुबेर, मुनमुन दत्ता, टीना दत्ता, शिवम शर्मा, पूनम पांडे, अजमा फल्लाह, आकांक्षा जुनेजा, जैद दरबार,आरुषी दत्ता, केविन अल्मासिफर, कॅट ख्रिश्चन आणि जय दुधाने हे कलाकार सामील झाल्याच्या बातम्या देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा