Sunday, June 8, 2025
Home अन्य बिग बॉसच्या घरामध्ये निमरितला मागे सारुन प्रियंकाने मारली बाजी.. बक्षिसामध्ये मिळाली ‘ही’ मोठी संधी

बिग बॉसच्या घरामध्ये निमरितला मागे सारुन प्रियंकाने मारली बाजी.. बक्षिसामध्ये मिळाली ‘ही’ मोठी संधी

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ च्या बुधवार ( दि. 12 ऑक्टेंबर) दिवशी प्रदर्शित झीलेल्या भागामध्ये अनेक वाद होताना पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचा 12 भाग पार पडला आसून, हा भाग खूपच धमाकेदार होता. यामध्ये सदस्यांचे कॉफीमुळे चांगलेच वाद पेटताना दिसून आले. यांनतर काही स्पर्ध काही स्पर्धकांना पाहून असे वाटत आहे की, या घरामध्ये लवकरच एक कपल पाहायला मिळनार आहे. ते कपल म्हणजे शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि टीना दत्त ( Tina Dutt) यांची मैत्री खूपच वाढलेली दिसत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अनेक वाद आणि चांगली मैत्री पाहायला मिळाली. कॉफीवरुन काही सदस्यामध्ये चांगलाच वाद पेटला होता आणि लगेच सगळे शांतही झाले. मात्र, यानंतर शालिन आणि टीना एकत्र बसून अशा प्रकारे गप्पा करत होते की, त्यांना पाहून असे वाटत आहे की, यांच्यामध्ये लवकरच नाते बनेल. त्यासोबतच गप्पा गोष्टी करताना शालिनच्या पहिल्या बायकोचीही किस्सा सांगितला. या भागामध्ये पुढे काही स्पर्धक आणि साजिद खान चेहऱ्यावर मास्क लावून अब्दुची मस्ती करताना दिसून आले.

त्यानंतर घराचा नवान कॅप्टन गौतम विग ( Gautam Vig) सगळ्यांना आपले काम समजावू सांगतो. यानंतर बिग बॉस प्रियांका चौधरी (Priyanka Cgaudharay) आणि निमरित कौर (Nimrit Kaur) या दोन अभिनेत्रींना अब्दुचे व्हिडिओ बनवण्याचा टास्क देतात. या पैकी कोण चांगला व्हिडिओ बनवून दाखवेल याची स्पर्धा सुरु होती. या दोघी आदेशानुसार व्हिडिओ बणवतात. मात्र, यामुळे अर्चना गौतम (Archana Gautam) हिला खूप राग येतो आणि ती एमसी स्टॅन (MC Stan) सोबत भांडण सुरु करते. या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटतो. पण घरातील काही सदस्य स्टॅनची बाजू घेताना दिसून येतात.

यानंतर बिग बॉस निमरित आणि प्रियंकाला फोन ठेवण्याचा आदेश देतात आणि या दोघी उरलेल्या सदस्याकडून आपल्या व्हिडिओसाठी मत मागतात. नंतर सगळे सदस्य बसून प्रियांका आणि निमरितचा व्हिडिओ पाहातात आणि सगळ्यांच्या सहमतीने प्रियांका हा टास्क जिंकते. यामुळे बिग बॉस तिला आपली आवडती खोली निवडण्याची संधा देतात. आजच्या भागात खोलीची निवड करताना कोणते सदस्य. किती वाद घालतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
एका जाहीरातीमुळे बदलली ‘तिची’ जिंदगी! थेट मिळाली होती ऋतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी
बॉलिवूडचा ‘हा’ कलाकर अमिताभ बच्चनमुळे शिकला शाळा, अभिनेत्याने स्व:च केला खुलासा

हे देखील वाचा