एका जाहीरातीमुळे बदलली ‘तिची’ जिंदगी! थेट मिळाली होती ऋतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी


टॉलीवूड ते बॉलीवूड आपल्या अभिनयाच्या जोरावर पुजा हेगडेने जोरदार पाय रोवले आहेत. तिचा जन्म १३ ऑक्टोबर १९९०चा. पुजाने नुकताच आपला ३०वा वाढदिवस साजरा केला. मुंबईत जन्म झालेल्या पुजाचा अभिनयाशी संबंध येणारच यात कोणालाही काही शंका असण्याचे कारण नाही. शाळा व कॉलेज जीवनात तीने अभिनय व मॉडेलिंग अशा दोन्हीतही चांगलं काम केलं. याच काळात तीने अनेक स्पर्धांतही भाग घेतला.

तिच्या अभिनयाची सुरुवात झाली ती तामिळ चित्रपट मुगामूडीने. २०१२साली आलेल्या या चित्रपटात तीने शक्ती नावाची जबरदस्त व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर तीची अभिनयाची गाडी जोरात धावू लागली व तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीत एक मोठं नाव होऊ लागलं.

काही वर्षांपुर्वीच पुजाने ब़ॉलीवूडमध्ये पाय रोवला. पहिलाच सिनेमा तीन ऋतिक रोशन सोबत केला. २०१६ साली आलेल्या मोंहजोदारो सिनेमात तीने अभिनय केला होता. ऋतिक रोशनसारखा दमदार अभिनेता सिनेमात असतानाही पुजाच्या भूमिकेचं जोरदार कौतूक झालं होतं. रुस्तम सिनेमासमोर हा सिनेमा टीकू शकला नाही परंतू पुजाचे कौतूक मात्र जोरदार झालं. या सिनेमानंतरच तीने मोठ्या बॅनरचे सिनेमे करायला सुरुवात केली.

पुजाच्या बॉलीवूड पदार्पणाचा किस्साही खास आहे. तिला पहिला ब्रेक रणबीर कपूरमुळे मिळाला होता. तिला पहिल्या सिनेमासाठी आशितोष गोवारीकर किंवा
ऋतिक रोशन या दोघांनीही पसंत केले नव्हते. आशितोष गोवारिकर यांच्या पत्नीने पुजाला रणबीर कपुरसोबत एका जाहीरातीत पाहिले आणि प्रभावित होत तीने आशितोषला पुजाचे नाव सांगत सिनेमात घ्यायला सांगितले. त्यानंतर आशितोषने तिला मोंहजोदारो सिनेमात मुख्य भुमिका दिली.

पुजाचे फॅनफॉलोविंग देखील मोठे आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंना पसंत करत असतात. करियरची सुरुवात ऋतिक रोशनबरोबर केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारबरोबर ती हाऊसफुल ४मध्येही दिसली आहे. आता ती थेट सलमानबरोबर काम करताना दिसेल.


Leave A Reply

Your email address will not be published.