टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो बिग बॉस 16(Bigg Boss) चा पहिला आठवडा धमाकेदार ठरला. बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांमध्ये खूप भांडण आणि वादविवाद झाला, ज्यामुळे शो सुरू होताच मजा रंगली आहे. या सिजनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सलमान खान ‘फ्रायडे का वार’ मध्ये आला आणि त्याने सर्व स्पर्धकांचे क्लासेस घेतले. ‘शनिवार का वार’ हा खास होता. कारण गुडबायचे स्टार रश्मिका मंदान्ना(Rashmika Mandanna) आणि नीना गुप्ता(Neena Gupta) या शोमध्ये पहिले पाहुणे म्हणून आले होते.
या कार्यक्रमाचा पहिला ‘वीकेंड का वार’ नुकताच पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान स्पर्धकांसोबत वेळ घालवताना दिसून आला आहे. सलमानने ‘शनिवार का वार’ मध्ये स्पर्धकांना काही सुचना देखील दिल्या. आता या कार्यक्रमाच्या ‘रविवार का वार’ या एपिसोडमध्ये एका सेलिब्रिटीची एन्ट्री होणार आहे. हा सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची पोलखोल करताना दिसणार आहे.
Saare contestants ke asli chehre dikhaayenge humaare guest aaj raat on Move and Shake with Shekhar Suman! ????
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot.#BB16 #BiggBoss #SundayBBWithShekhar@BeingSalmanKhan pic.twitter.com/5ANggC82Q9
— Bigg Boss (@BiggBoss) October 9, 2022
या प्रोमोमध्ये चेहऱ्यावर मास्क घातलेली एक व्यक्ती दिसत आहे. आता पुन्हा एक बॉलिवूड कलाकार संडे का वार मध्ये प्रवेश करणार आहे, तो अभिनेता जेव्हा मास्क कोणतो तेव्हा दुसरा कोणी नसून शेखर सुमन हा प्रसिद्ध अभिनेता अँकर, निर्माता, दिग्दर्शक आणि गायक देखील आहेत. एवढेच नाही तर त्याने अनेक टेलिव्हिजन शोचे परिक्षण केले आहेत. शेखर सुमन आता बिग बॉसच्या घरात पदार्पणासाठी सज्ज आहे. या प्रोमोला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मुव्ह अँड शेक विथ शेखर सुमनमध्ये सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे काढले जाणार.’
बिग बॉसचा ‘रविवार का वार’ हा एपिसोड शेखर सुमन हे होस्ट करणार आहेत, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. या एपिसोडमध्ये स्पर्धांकाना काही टास्क देऊ शकतात. आता शेखर सुमन यांची एन्ट्री झाल्यानं बिग बॉसच्या घरात अडचणी निर्माण होतील की नाही? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अब्दू, निमृत कौर, गौतम, शालीन, सुंबुल, टीना, सौंदर्या, एससी स्टेन, साजिद खान आणि शिव ठाकरे या स्पर्धकांनी बिग बॉस-16 मध्ये सहभाग घेतला आहे. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. तसेच विविध टास्क देखील खेळतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘माझी भूमिका तू साकारणार म्हणजे…’; सुष्मिता सेनच्या भूमिकेबद्दल गौरी सावंतने केली पोस्ट शेअर
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’मध्ये अर्जुन कपूर खलनायक होणार का? निर्मात्याचे ‘हे’ विधान आलं समोर