बिग बॉस १६ चा अंतिम सोहळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे. या पर्वात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे हे पर्व तुफान गाजले. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे शेवटचे दिवस अधिकच कठीण होताना दिसत आहे. रोज शोमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असून, हे सर्व प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत शोमध्ये अनेक मोठे ट्विस्ट आल्यानंतर आता पुन्हा एकदा शोमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. सध्या शोमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांचा आतापर्यंतचा शोमधील प्रवास दाखवल्यानंतर आता शोमध्ये नवीन टर्न येणार आहे.
शालीन भानोत आणि प्रियांका चौधरी यांचा बिग बॉसमधील प्रवास पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना अर्चना गौतम, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. सोबतच बिग बॉसमध्ये एका व्यक्तीची दमदार एन्ट्री देखील होणार आहे. हा व्यक्ती या सर्व स्पर्धकांसाठी धोक्याची घंटा असणार आहे. नुकताच कलर्स चॅनेलकडून एक प्रोमो दाखवला गेला आहे. तो पाहून सर्वच लोकं अंदाज लावू शकतील की, बिग बॉसमध्ये आता मोठे काही घडणार आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतात, “घरात मोठे संकट येत आहे” इतक्यातच घरात एन्ट्री होते ती रोहित शेट्टीची. रोहित शेट्टी घराच्या गार्डन भागात काच तोडत दमदार एन्ट्री घेताना प्रोमोमध्ये दिसत आहे.
#BiggBoss16 Tomorrow Episode Promo – Shiv, Stan and Archana Journey Videopic.twitter.com/E5v7n9EUOU
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) February 9, 2023
अंतिम फेरीच्या अगदी थोडाच काळ आधी रोहित शेट्टीची घरात होणारी एन्ट्री विचार करायला लावणारी आहे. आता रोहित शेट्टी का घरात येणार कोणते टास्क असेल? एलिमनेशन असेल? गिफ्ट असेल? की अजून काही हे तर शो पाहिल्यावरच समजणार आहे. तत्पूर्वी बिग बॉसचे हे पर्व तुफान गाजत आहे. आता शालीन भानोत, प्रियांका चौधरी, अर्चना गौतम, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यापैकी शोची ट्रॉफी कोण जिंकणार हे लवकरच समजेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
यालाच म्हणतात खरे प्रेम! शून्य डिग्री तापमानात उमेश कामतने प्रियासाठी दिली प्रेमाची परीक्षा
मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्री असूनही पीके रोझी यांनी ‘या’ कारणामुळे काढले त्यांचे संपूर्ण आयुष्य अज्ञानात