Monday, June 9, 2025
Home अन्य पत्नीनेच उघडला शालिनचा खोट्या चेहऱ्याचा मुखवटा; म्हणाली, ‘मी तुझी बेस्ट फ्रेंड….’

पत्नीनेच उघडला शालिनचा खोट्या चेहऱ्याचा मुखवटा; म्हणाली, ‘मी तुझी बेस्ट फ्रेंड….’

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ मध्ये अनेक धमाकेदार गोष्टी पाहायला मिळत आहे. जिथे अनेक वाद पेटतात आणि भांडण पहायला मिळतात अशातच काही जोडप्यांमध्ये प्रेमाचे फुल फुलताना दिसून येत आहे. यावेळेस बिग बॉसमध्ये अनेक बदलही पहायला मिळाले आहेत. घरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे शालिन भनोट (Shalin Bhanot). हा आपल्या खडतर स्वभावामुळे नेहमी ओळखला जातो, पण आता तो टीना दत्ता (Tina Dutta) सोबत वाढलेल्या मैत्रीमुळे चर्चेत आला आहे. मागच्या भागामध्ये त्याने टीना सोबत फ्लर्ट करत असताना त्याच्या पूर्व पत्नीनीचा एक किस्सा शेअर केला होता, ज्यामुळे तिने आपला संताप व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शालिनला चांगलीच फटकार लावली आहे.

अभिनेता शालिन याने टीनाला पसंद करत आहे, अशी भावणा सगळ्यांसमोर व्यक्त केली होती. मात्र, यासगळ्या चक्करमध्ये त्याने त्याच्या पूर्व पत्नी दलजित कौर (Dalljit Kaur) हिचे नाव न घेता तिच्याबद्दल असे काही वक्तव्य केले की, ती खूपच संतापली. झाले असे की, शालिनने टीना सोबत फ्लर्ट करत असताना आपल्या पत्निचा एक किस्सा सांगितला आणि त्यावर टीनाने शालिनला प्रश्न विचारला की, “खरंच तुमचे नाते एवढे एब्यूजिव होते? मग शालिन सांगतो की, नाही आम्ही आजही बेस्ट फ्रेंडस् आहेत. मग टीना बोलते की, मी दलजीतला ओळखते पण पर्सनली नाही.” अशा वक्तव्यामुळे दलजीत खूपच संतापली आणि तिने आपली बाजू मांडत ट्वीटरवर आपला राग व्यक्त केला.

दलजितने ट्वीट करत शालिनचा खोटा चेहरा जगासोमर आणला,आणि ट्वीट करत लिहिले की, “मी तुझी बेस्ट फ्रेंड नाही. माझ्या मुलामुळे महिन्यातुन एक दोन वेळेस भेटण्याला मैत्री म्हणत नाही . मी तुझ्या लव लाईफसाठी शुभेच्छा देत आहे, पण मला तुझ्या असल्या गोष्टींपासून लांबच ठेव. तुम्ही याला फनी म्हणतात खरंच? टीना माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच भावना नाहित. ” अशा तिखट शब्दात तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्री दलजित कौर हिपण बिग बॉस 13 चा भाग बनली होती, पण तिला फार काळ घरामध्ये टिकता आले नाही. शालिन आणि दलजीत यांची भेट ‘कुलवधू’ कार्यक्रमाच्या सेटवर झाली. यानंतर त्यांनी खूप दिवस एकमेकांना डेट केलं आणि 2009 मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. मात्र, यांचे नाते फार काळ टिकले नाही. पाच वर्षानंतर यांचा घटस्फोट झाला असून यांना एक मुलगा आहे जो शालिनसोबत राहात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर; म्हणाली, ‘ही गोष्ट सांगण्यासाठी मी…’
कियारा अडवाणीसोबतच्या लग्नावर सिद्धार्थ मल्होत्राने तोडले मौन, म्हणाला, ‘काहीही गुप्त ठेवणार…’

हे देखील वाचा