Sunday, May 19, 2024

शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड शोमध्ये करणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे चर्चेत आहे. पहिली म्हणजे अभिनेत्री श्रीजिता डे, जी शोच्या पहिल्या आठवड्यात बाहेर पडली तर दुसरा अभिनेता विकास मानकटला. अशातच बातम्या येत आहेत की, घरात आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे जी बिग बॉस स्पर्धक शिव ठाकरेचे हाेश उडवणार आहे. 

बिग बॉस 16 च्या (Bigg Boss 16) नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) पहिल्यांदाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलला. टीना दत्ता (Tina Duttas) आणि साजिद खान (Sajid Khan) यांच्यासोबत बसले असताना शिवने त्याची इमोशनल प्रेमकथा सांगितली. शिवने सांगितले की, “त्यांची प्रेमकहाणी बिग बॉस मराठी दरम्यान सुरू झाली. तिथेच त्याची पहिल्यांदा अभिनेत्री वीणा जगपतशी भेट झाली.” बिग बॉस मराठीच्या घरात दोघांची केमिस्ट्री चांगलीच चर्चेत होती. मात्र, नंतर दोघे वेगळे झाले.

शिवने पुढे साजिद आणि टीनाला सांगितले की, “बिग बॉस मराठीच्या वेळी त्याला विचारण्यात आले होते की, तुमची वीणावर खरोखर प्रेम आहे का, तुम्ही तिचे नाव गोंदवू शकता का आणि तिने तसे केले.” शिवने आपल्या हातावर बनवलेला टॅटूही दोघांना दाखवला. मात्र, सात महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले.

शिवची प्रेमकहाणी ऐकून साजिदला खूप आश्चर्य वाटले आणि विचारले, “याचा अर्थ तू सिंगल आहेस, पण तू म्हणत हाेतास की, तुझी बाहेर गर्लफ्रेंड आहे.” ज्याच्या उत्तरात शिव म्हणाला, “नाही सर, आधी मी सिंगल होतो आणि आताही सिंगल आहे.” दरम्यान, टीना म्हणते की, “बिग बॉसच्या घरात कोणीही प्रेमात पडू शकत नाही असे तिला वाटत नाही.”

शिवच्या मनाची स्थिती जाणून घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, बिग बॉस शिवची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापला त्यांच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देणार आहे. आता घरात आपल्या एक्स गर्लफ्रेंडला पाहिल्यानंतर शिव काय प्रतिक्रिया देईल हे पाहणे खूप मनोरंजक असेल. (bigg boss 16 shiv thakare ex girlfriend actress veena jagtap to enter in bb16 house as wild card)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हे पाहिलं का? श्रीजीता अन् शालीन भानोतची मैत्री पाहून टीनाला अश्रू अनावर

‘क्या कीजे’ गाण्याचा नवीन अल्बम, प्रतिभा सिंग यांच्या आवाजात ऐकाल अपूर्ण लव्हस्टोरी

हे देखील वाचा