Tuesday, July 9, 2024

ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या टॉप नॉन फिक्शन पर्सनालिटीजमध्ये या कलाकाराने मारली बाजी

बिग बॉसचे १६ वे पर्व नुकतेच संपले. हे पर्व बिग बॉसच्या आधीच सर्वच पर्वांपेक्षा जरा जास्तच गाजले. या पर्वातील स्पर्धकांनी देखील अमाप लोकप्रियता मिळवली. रॅपर एमसी स्टॅनने या पर्वत इतर स्पर्धकांना पछाडत विजेत्यांच्या ट्रॉफीवर नाव कोरले. सगळ्यांनाच वाटत होते की, शिव ठाकरे जिंकणार मात्र असे न होता एमसीने एकावेळी बाजी मारली. असे असूनही बॉस बॉसमधील अनेक कलाकार खेळाडू त्यांच्या खेळामुळे चांगलेच हिट झाले. तब्बल १९ आठवडे चालू असणाऱ्या या शो प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. या शोमधील अनेक खेळाडू सोशल मीडियावरही चांगलेच हिट ठरत आहे. अशातच ऑरमॅक्स मीडियाने टॉप नॉन-फिक्शन पर्सनालिटीज असणाऱ्या कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली असून, यात बिग बॉसमधील सदस्यांचा समावेश आहे.

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील जानेवारी महिन्याच्या टॉप नॉन फिक्शन पर्सनालिटीजच्या यादीत सर्वात पहिले नाव आहे ते कॉमेडी किंग कपिल शर्मा याचे. दुसऱ्या स्थावर आहे एमसी स्टॅन, तिसऱ्या स्थावर आहे प्रियंका चाहर, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे सलमान खान आणि शिव ठाकरे आहे. या यादीमध्ये एमसी स्टॅनने तर सलमान खानला देखील मत देत दुसरे स्थान काबीज केले आहे. सलमानच्या आधी एमसी आणि प्रियांका ही दोन बिग बॉस स्पर्धक यादीत आहे.

विशेष बाब म्हणजे या यादीमध्ये सर्वात शेवट शिव ठाकरेचे नाव आहे. शिव ठाकरे तर बिग बॉस १६ जिंकणारच असे विश्वासाने म्हटले जात असताना आणि मात्र शिव चांगलाच पिछाडीवर गेला आहे. या यादीमध्ये प्रियांका शिवच्या आधी बाहेर पडूनही यादीत प्रियंकाने त्याच्या पुढे आहे. प्रियंकाने तिच्या लोकप्रियतेमध्ये शिवला चांगलीच मत दिली आहे. एमसी संतांची लोकप्रियता चांगलीच दिसत असून याच आधारावर तो बिग बॉस १६ चा विजेता बनला.

या यादीमध्ये टॉपमध्ये दिसणारे सर्वच कलाकार येणाऱ्या दिवसांमध्ये देखील चांगलेच गाजणार आहे. माहितीनुसार प्रियांका आणि एमसी एका व्हिडिओमध्ये सोबत दिसणार आहे, तर शिव खतरो के खिलाडीमध्ये दिसेल. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा