Wednesday, March 29, 2023

भांडं फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न झाले आहे. अभिनेत्रीने राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आहे. याची माहित खुद्द अभिनेत्रीने ट्विट करत दिली आहे. जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमके ट्विटमध्ये? चला जाणून घेऊया…

स्वराने ट्विट करत लिहिले की, “कधीकधी तुम्ही तुमच्या शेजारी असलेल्या एखाद्या गोष्टीचा शोध लांबून घेता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली आणि मग आम्ही एकमेकांना शोधले. माझ्या हृदयात स्वागत आहे फहाद अहमद. इथे खूप गोंगाट आहे, पण तो तुमचा आहे!” स्वरा भास्करने या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. यासोबतच दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचेही संकेत मिळत आहेत. अशाप्रकारे सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

फहाद अहमद हे समाजवादी पक्षाशी संबंधित असून ते समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेशी संबंधित आहेत. स्वरा भास्कर शेवटची ‘जहां चार यार’ या चित्रपटात दिसली होती, जो सप्टेंबर 2022 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला. स्वरा भास्करला ‘निल बट्टे सन्नाटा’ आणि ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट भूमिकांसाठी ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

34 वर्षीय स्वरा भास्करने 2010 मध्ये ‘गुजारिश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, 2011 मध्ये आलेल्या ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटाने तिला जबरदस्त ओळख दिली. ती मिरांडा हाऊस, दिल्ली येथून पदवीधर आहेत तर तिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.(bollywood actress swara bhaskar ties knot with samajwadi party youth leader fahad zirar ahmed video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
डायरेक्टरने खूप मनवलं, तरीही समंथा अडली; ‘पुष्पा 2’मध्ये ‘तसलं’ काम करण्यास थेट दिला नकार

आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा