Friday, October 18, 2024
Home टेलिव्हिजन धक्कादायक! बिग बॉस विजेत्या एमसी स्टॅनला बजरंग दलाला दणका, रॅपरने ठोकली धूम

धक्कादायक! बिग बॉस विजेत्या एमसी स्टॅनला बजरंग दलाला दणका, रॅपरने ठोकली धूम

बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन त्याच्या विजयानंतर सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. अलीकडेच एमसी स्टॅन इंदूरला लाइव्ह कॉन्सर्ट करण्यासाठी पोहोचला हाेता. या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांचीही मोठी गर्दी झाली होती. अशात कॉन्सर्ट सुरू असताना काही लोकांनी स्टेजवर जाऊन गोंधळ घातला. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तांनुसार, 17 मार्च रोजी इंदूरमध्ये एमसी स्टॅन (mc stan) याचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता, यादरम्यान आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली. अशात काही लोकांनी स्वतःला बजरंग दलाचे सदस्य म्हणवून घेत मंचावर पोहोचून मोठा गोंधळ घातला.

ते म्हणाले की, ‘एमसी स्टॅनची गाणी उघडपणे महिलांवर अत्याचार आणि आक्षेपार्हतेच्या विरोधात आहेत.’ इतकंच नाही, तर एमसी स्टेन आपल्या रॅपमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्याचा तरुणांवर खूप वाईट परिणाम होतो.’ हे पाहता काही लोक रॅपरच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचले आणि स्टेजवर पोहोचल्यानंतर त्यांनी रॅपरला धमकावलेच नाही, तर मारहाणही केली. मात्र, या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे. हे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

रॅपर स्टेनच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एमसी स्टॅन त्याच्या कारमध्ये  शो अर्ध्यातून साेडून जाताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या मागे चाहत्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून स्टॅनच्या चाहत्यांनी ट्विटरवर त्याच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटरवर #PublicStandWithMSTan ट्रेंड करत आहे. एवढी कडेकोट सुरक्षा असतानाही बजरंग दलाचे कार्यकर्ते स्टेजवर कसे पोहोचले, असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे. यानंतर, रॅपरचे उर्वरित शो देखील रद्द करण्यात आले आहेत.(bigg boss 16 winner mc stan got beaten by bajrang dal in indore live show concert video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा