Monday, March 4, 2024

बिगबाॅस 17मधला अरुण वडीलांच्या मृत्युने झाला होता डिप्रेस,जाणुन घ्या कसा बनला ‘अचानक भयानक’

सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुविवादीत रियालिटी शो बिग बाॅस 17चा (BigBoss 17)आज रविवारी, 28 जानेवारीला ग्रँड फिनाले आहे. बिगबाॅसच्या टाॅप 5 कंटेस्टंटमध्ये मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) , मुनावर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण श्रीकांत महाशेट्टींचा समावेश आहे. .या सिझनची ट्राॅफी कोण घरी घेऊन जाणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे काही चाहते विकी जैन आणि इशा मालवीया सारखे खेळाडु घराबाहेर गेले आणि अरुण टाॅप 5 मध्ये गेल्याने थक्क झाले आहेत. प्रत्येकजणाला हेच जाणुन घ्यायचं आहे की, हा अरुण महाशेट्टी आहे तरी कोण?

अरुण हैदराबादमध्ये राहतो. लोक त्याला चारमिनारचा राजकुमार म्हणुनंही ओळखतात. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर ला हैदराबादमध्येच झाला होता. हैदराबादमध्येच त्याने त्याचं पुढचं शिक्षणही पुर्ण केलं. पुढे अरुणने फ्रांसमधील पॅरीसमध्ये राहणाऱ्या मलक महाशेट्टीसोबत लग्न केलं.15 मार्च 2021 ला दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे, तिचं नाव जूरी महाशेट्टी आहे.

अरुण श्रीकांत महाशेट्टी एक सुप्रसिद्ध युट्युबर आहे. ‘अचानक भयानक ‘(Achanak Bhayanak) असं त्याच्या युट्युब चॅनेलचे नाव आहे. युट्युबवर त्याचे 653K सब्सक्राइबर आणि इंस्टाग्रामवर एक मिलियन फाॅलोवर्स आहेत. सोशल मिडियावर अरुणचे भरपुर फॅन-फाॅलोविंग आहे. त्याने त्याच्या करियरची सुरुवातच गेमिंग वीडियोजच्या माध्यमातुन केली होती. अरुणच्या युट्युब कंटेंटबद्दल बोलायचं तर, तो जास्त करुन गेमचे लाइव स्ट्रीमिंग आणि जगभरातील ओमेगल सदस्यांसोबतचा संवाद करतो. अरुणचे संपुर्ण परिवार उच्च शिक्षीत आहे. तो(Arun Mashetty) अनेकदा त्याच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत मजेदार वीडियोसुद्धा बनवतो. जे सोशल मीडियावरही खुप वायरल होतात.

त्याने एका संवादात सांगितले होते की, कोरोनाकाळात त्याचे वडील स्वर्गवासी झाले. या गोष्टीमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यानंतर त्याच्या एका मित्राने त्याला गेमिंग विडियो बनवण्याची आयडिया दिली होती. बिगबाॅस 17मध्ये दिसलेला अरुण टाॅप 5 कंटेस्टंटमधला एक म्हणुन पुढे आला आहे.शोमध्ये अरुणला त्याच्या हैद्राबादी ऍक्सेंटमुळे खुप लोकप्रियता मिळाली आहे.

हे देखील वाचा