Friday, October 17, 2025
Home कॅलेंडर भाजप नेत्या सोनाली फोगट यांना बिग बॉसच्या घरात अश्रू अनावर

भाजप नेत्या सोनाली फोगट यांना बिग बॉसच्या घरात अश्रू अनावर

बिग बॉसमध्ये हरियाणामधील महिला भाजप नेत्या सोनाली फोगट यांची नुकतीच एंट्री झाली. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून त्यांची एंट्री झाली असून त्यांच्या एन्ट्रीने घरातील खेळ आणखी मजेदार होत आहे. बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात सोनाली आणि गायक राहुल वैद्य एकमेकांशी बोलत असतात. त्यात ते सोनाली आणि त्यांचे पती संजय फोगट यांच्याबाबदल बोलत असतात आणि बोलता बोलता अचानक सोनाली रडायला लागल्या.

२०१६ साली सोनाली यांचे पती संजय हे त्यांचे फार्म हाऊसवर मृत अवस्थेत आढळून आले होते. त्याच्या आठवणींनी सोनाली खूप भावुक झाल्या आणि रडू लागल्या.

सोनाली यांनी राहिलशी बोलताना सांगितले की, “मी खूप रूढीवादी घरातून आले. जिथे स्त्रियांनी घराबाहेर पडून काम करणे चुकीचे मानले जाते. मात्र तरीही मी या गोष्टींमधून मार्ग काढत इथवर पोहचली. मी अनेक वर्ष रडून काढले. या रडण्याचा माझ्या डोळ्यानवर खूप वाईट परिणाम देखील झाला. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला प्रोत्साहन देत राजकारणात जाण्याचा सल्ला दिला. माझ्या पतींची देखील अशीच इच्छा होती की मी राजकारणात सक्रिय व्हावे. माझ्या पतीच्या निधनानंतर मी अनेक रात्र जागून काढल्या. मी अजून सुद्धा त्या फार्म हाऊसवर जाते तेव्हा माझ्या त्या सर्व आठवणी ताज्या होतात.”

सोनाली यांना त्यावेळी घरातील राहुल महाजन, जैस्मिन भसीन, अली गोनीसह अनेक सदस्यांनी हिंमत देत सांत्वन केले आणि त्या एकट्या नसून ते सर्व त्याच्या सोबत असल्याचे सांगितले.

बिग बॉसमध्ये जाण्याआधी सोनाली यांनी सांगितले होते की, “माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला खरा समाज समजला. कारण पतीच्या मृत्यूनंतर त्या स्त्रीकडे पाहण्याच्या लोकांच्या नजर बदलून जातात. जर सुंदर स्त्री असेल तर तिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर जगण्याचा अधिकारही नसतो. माझ्या बाबतीतही असे अनेकदा झाले मात्र ह्याच गोष्टींनी मला मजबूत बनवले.”

दरम्यान सोनाली फोगट ह्या टिक टॉक स्टार म्हणून प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा