बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यापासून खूप वादविवाद होताना दिसत आहेत. अनेक सदस्य भांडण करत आहेत. आता यात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा पुन्हा एकदा अपमान केला गेला आहे. यापूर्वी निक्की तांबोळी अनेकदा वर्षा यांचा अपमान करताना दिसली आहे. पण आता यावेळी जान्हवी किल्लेकर हिने वर्षा यांचा अपमान केला आहे.
जान्हवी किल्लेकरने रात्री कुठे झोपायचं या गोष्टीवरून वाद घातला आहे. वर्षा यांचं अंथरून सुद्धा तिने बाजुला टाकलं. नंतर गायक अभिजित सावंत याने जान्हवीला समजावून सांगितलं. मग बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने, जय दुधाने याने जान्हवी बद्दल एक संतप्त पोस्ट केली आहे.
आपल्या पोस्ट मध्ये जय म्हणतो, जान्हवी, महाराष्ट्राच्या सुपरस्टार अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या सोबत कशी वागली हे तिला दाखवून देण्यासाठी अभिजित सावंतला हॅट्स ऑफ! ही खूप अपमानजनक गोष्ट आहे. मी सुद्धा घारात भांडणं केली. पण मला आठवतंय की आमच्या सिझन मधील कोणत्याही स्पर्धकाने सिनियर व्यक्तीचा अनादर केला नाही. याशिवाय जय जान्हवीला बुगु बुगु देखील म्हणाला.
जयने निक्की तांबोळी हिला देखील खडे बोल सुनावले आहेत. जय म्हणाला, निक्की हि आजवरची सर्वात वाईट सदस्य आहे. वर्षा यांचा वारंवार अपमान होत असल्याने निक्की सर्वांच्या निशाण्यावर आली आहे. आता यावर होस्ट रितेश देशमुख काय म्हणतोय हे बघावं लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
23 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित होत असलेल्या ‘मुरारी’ने केला विक्रम, प्री-बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
‘बिग बॉस’मधील अनिल कपूरचे होस्टिंग प्रेक्षकांना कसे वाटले? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु