Saturday, July 6, 2024

Manisha Rani New Car: ‘बिग बॉस’फेम ‘ही’ अभिनेत्री बनली आलिशान कारची मालकीण, स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केली महागडी कार

सोशल मीडिया सेन्सेशन मनीषा राणी (Manisha Rani), जी बिहारमधील एका छोट्या गावातली आहे.पण तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मनीषाने सलमान खानच्या वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2‘ मध्ये तिच्या मजेदार व्यक्तिमत्त्वाने लाखो मने जिंकली. सेकंड रनर अप ठरलेली मनीषा आज प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाली आहे. बिग बॉस सोडल्यानंतर मनीषाने आधी नवीन घर घेतले होते. आता मनीषाने तिच्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

बिग बॉस ओटीटी 2’फेम मनीषा राणी (Manisha Rani Photos) सध्या आनंदी वातावरणात आहे. तिने आपले स्वप्न पूर्ण केले आणि पहिली कार खरेदी (Manisha Rani Bought a Car) केली. मनीषा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ (Manisha Rani Video) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

मनीषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना मनीषाने लिहिले की, “स्वप्ने फार दूर नाहीत. मी माझी पहिली कार घेतली आहे. #मर्सिडीज.” व्हिडिओमध्ये मनीषा म्हणतेय की, स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत. पण जर आपण रोज मेहनत केली तर एक दिवस आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील. व्हिडिओमध्ये मनीषा खूप उत्साहित आणि आनंदी दिसत आहे. (Manisha Rani New Car)

सोशल मीडियावर चाहते आणि स्टार्सही या कारसाठी तिचे अभिनंदन करत आहेत. नेहा कक्करने तिच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले की, “खूप आनंद झाला.” मनीषाने काही दिवसांपूर्वी नवीन घरही घेतले होते. तिने चाहत्यांना आपल्या घराची झलकही दाखवली होती. तिने यूट्यूबवर होम टूर देखील दिली आणि घराशी संबंधित प्रत्येक गोष्टी तपशीलवार दाखवला होता. (‘Bigg Boss OTT 2’ Fame Manisha Rani Fulfils Her Bucket List And Drives Home A Swanky New Mercedes)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Rani (@manisharani002)

मनीषाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, मनीषाचा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मनीषाने टोनी कक्करसोबत एक म्युझिक व्हिडिओही केला होता. तिने भोजपुरी इंडस्ट्रीतही काम केले आहे. ती यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Bigg Boss fame actress Manisha Rani bought a Mercedes car)

आधिक वाचा-
Christmas 2023: प्रियांका चोप्राने सुरू केली ख्रिसमसची तयारी, ‘देसी गर्ल’ने फोटो शेअर करून दाखवली झलक
Randeep Hooda Reception Video: रणदीपच्या रिसेप्शनमध्ये तमन्नाने अभिनेत्याच्या वधूसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा