Tuesday, September 26, 2023

तब्बल 20 वर्षांपासून आपल्या वडिलांना भेटली नाही ‘वेड’ फेम जिया शंकर; जगापुढे मांडल्या वेदना; म्हणाली…

वेड‘ सिनेमात काम करून लाखो चाहत्यांना आपले वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे जिया शंकर होय. जिया सध्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’मध्ये झळकत आहे. या शोचा फिनाले खूपच जवळ आला आहे. तसेच, शोचे अव्वल 5 स्पर्धकही मिळाले आहेत. त्यात एल्विश यादव, अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा कुमारी आणि बेबिका शो यांचा समावेश आहे. तसेच, अभिनेत्री जिया शंकर शोमधून बाहेर पडली आहे. मात्र, जियाने बाहेर पडण्यापूर्वी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने भाष्य केले. यादरम्यान तिने एल्विश यादवला आपल्या वडिलांबाबत सांगितले. तिने असे काही वैयक्तिक खुलासे केले, ज्याने चाहत्यांनाही भावूक केले आहे.

जिया शंकर (Jiya Shankar) हिने एल्विश यादव (Elvish Yadav) याला सांगितले की, तिचे वडील तिला आणि आईला 20 वर्षांपूर्वीच सोडून गेले होते. त्यानंतर तिने कधी त्यांच्याशी संपर्क साधला नाही. ते कुठे आहे, याचीही तिला माहिती नाहीये. मात्र, तिला हे माहिती आहे की, त्यांनी दुसरे लग्न केले आहे आणि दुसऱ्या पत्नीकडून त्यांना एक मुलगीही आहे. हे सर्व सांगत असताना जिया खूपच भावूक झाली. मात्र, जियाने असेही म्हटले की, तिला तिच्या वडिलांची खूपच आठवण येते.

यापूर्वी माध्यमांमध्ये असे सांगण्यात आला होता की, जिया तिच्या वडिलांचे आडनाव लावत नाही. तिच्या नावापुढे शंकर आडनावाचा तिच्या वडिलांशी काहीही संबंध नाहीये.

आपल्या अखेरच्या एपिसोडमध्ये एलिमिनेशनपूर्वी जिया एल्विशसोबत बोलताना दिसली. यादरम्यान एल्विश तिला विचारतो की, तिला तिच्या वडिलांबद्दल बोलायला आवडत का नाही? यावर जिया सांगते की, “नाही, आम्ही कधीच बोललो नाहीत. मला तर हेही माहिती नाहीये की, ते कुठे आहेत, कसे दिसतात. मी त्यांचा आवाजही ऐकला नाहीये. मी 20 वर्षांमध्ये त्यांना कधीच भेटले नाही. आमच्यात संपर्क नाहीये. दुसऱ्या लग्नातून त्यांना एक मुलगीही आहे. त्यांची आणखी एक पत्नी आणि मुलगी आहे. ते आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यामुळे त्यांना आता आमची चिंता का असेल?”

जियाने सांगितले की, जेव्हा ती लहान होती, तेव्हाही तिच्या वडिलांनी तिच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ती आणि तिची आई कुठे आहेत, काय करत आहे, कसे राहतात? पण जिया आणि तिच्या आईला याचा काहीही फरक पडत नाही. जियानुसार, तिने आयुष्यातील वाईट काळ पाहिला आहे आणि आता तिच्या आयुष्यात सर्वकाही ठीक आहे, त्यामुळे तिला त्यांचा काहीच फरक पडत नाही. जियाने तिच्या आयुष्यातील त्या पैलूंचाही खुलासा केला, जेव्हा तिला तिच्या वडिलांची खूप आठवण आली होती.

जिया म्हणते की, “जेव्हा मी इतर कुटुंबांना सोबत पाहते. जेव्हा कोणी वयस्कर व्यक्ती मला काही विचारतो आणि मी माझ्या भावना प्रकट करू शकत नाही की, मी त्यांच्यासोबत नसल्याने दुखी होते. जेव्हा मी लहान होते आणि मला कोणी काही विचारायचे, तेव्हा त्यांच्याकडे धावत जायचे आणि ते माझी बाजू घ्यायचे. जेव्हा मला असुरक्षित वाटायचे, तेव्हा त्यांना माझी खूपच काळजी होती. मात्र, त्यांना उत्तर देऊ शकत नव्हते. अशा क्षणी मला त्यांची खूप आठवण येते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jiya Shankar (@jiyaashankarofficial)

जिया शंकरविषयी बोलायचं झालं, तर तिने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमात काम केले आहे. तिला ‘काटेलाल अँड सन्स’मधील सुशीला रुहेल सोलंकी या पात्रासाठी ओळखले जाते. तिने ‘पिशाचिनी’, ‘मेरी हानिकारक बीवी’ यांसारख्या मालिकेतही काम केले आहे. तसेच, 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ (Ved) या मराठी सिनेमातही तिने काम केले आहे. या सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख (Riteish Deshmukh), जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्याही मुख्य भूमिका होत्या. विशेष म्हणजे, वेड या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. (actress jiya shankar on not seeing father from 20 years says i dont even no where he is read here)

महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला 6 महिन्यांचा तुरुंगवास, ठोठावला ‘एवढ्या’ रुपयांचा दंड
‘गदर 2’च्या वादळात उडून गेला अक्षयचा ‘OMG 2’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई

हे देखील वाचा