Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीचे नवीन गाणे प्रदर्शित, एकाच दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक हिट्स

‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीचे नवीन गाणे प्रदर्शित, एकाच दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक हिट्स

‘बिग बॉस 14’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी या दिवसात तिच्या कामामध्ये खूपच व्यस्त आहे. ती मागील दीड महिन्यापासून केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याआधी ती टोनी कक्करचा म्युझिक व्हिडिओ ‘नंबर लिख’ मध्ये दिसली होती. अभिनेत्रीचे नवीन व्हिडिओ गाणे प्रदर्शित झाले आहे.

निक्की तांबोळीचे ‘शांती’ हे गाणे नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत मिलिंद गाबा दिसत असून त्यानेच हे गाणे गायले आहे. हे पार्टी गाणे आहे. मिलिंदने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यात आता आणखी एका सुपरहिट गाण्याची भर पडली आहे. (Bigg Boss fame actress Nikki tamboli’s new shanti song release on YouTube)

या गाण्यात निक्की तिच्या अदा दाखवताना दिसत आहे. या गाण्यातील रॅप वाला भाग असली गोल्ड यांनी लिहिला आहे. या गाण्याचे दिग्दर्शन सत्ती ढिल्लो यांनी केले आहे. निक्कीचे हे गाणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गाण्याला यूट्यूबवर एकाच दिवसात 45 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्याबाबत बोलताना मिलिंदने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, “शांती हे एक मजेशीर पार्टी साँग आहे. या गाण्याचे गीत आणि संगीत दोन्हीही आकर्षक आहेत. मला आशा आहे की, माझ्या चाहत्यांना माझे हे नवीन गाणे नक्कीच आवडेल.”

निक्कीने देखील सांगितले की, “मिलिंद गाबासोबत या गाण्याचे चित्रीकरण करताना मला खूप मज्जा आली आहे. अशी आशा करते की, प्रत्येकाला हे गाणे खूप आवडेल.”

निक्की तांबोळी ही ‘बिग बॉस 14’ मध्ये दिसली होती. तिने घरात असताना प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. तसेच तिचे चाहते देखील खूप आहेत. या शोमध्ये ती टॉप 3 स्पर्धकांमध्ये होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायकाला पाहून अर्जुनने दिली होते फॅनसारखी रिऍक्शन; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-‘माझ्या मनासारखा म्हणजेच असा’, म्हणत ‘बाहुबली’वर प्रेम व्यक्त करताना दिसली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

हे देखील वाचा