‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन


बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही तिच्या चित्रपटांपेक्षा अनेक वादविवादामुळे खूपच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिचे नाव चर्चेत आले आहे. नुकतेच तिच्या प्रेग्नेंसीबाबत बातमी समोर आली आहे. परंतु तिने या बातम्यांना खोटे सिद्ध केले आहे. अभिनेत्रीने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. तिने याबाबत दिलेले उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. (Bollywood actress Poonam Pandey slams pregnency rumours)

एका मुलाखतीत पूनम पांडेने सांगितले की, “मला जबरदस्तीने प्रेग्नेंट नका करू. एका महिलेसाठी ही एक आनंदाची गोष्ट असते, पण माझ्यासाठी ही गोष्ट आता खूप वाईट आहे.”

यानंतर तिने सांगितले की, “मी प्रेग्नेंट नाहीये. एकदा मला याबाबत विचारा तरी. माझं आयुष्य एका उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे आहे. मी प्रेग्नेंट असेल तेव्हा पेढे वाटेल.”

जवळपास 2 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर पूनमने तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले आहे. पूनमने स्वतः या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली होती.

लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. तिने असे सांगितले होते की, सॅमने तिला खूप मारहाण केली होती. त्यामुळे तिला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले होते. परंतु या घटनेनंतर पूनम आणि सॅम पुन्हा एकत्र आले.

याबाबत तिने खुलासा केला की, “आम्ही गोष्टींना पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. ही गोष्ट तुम्हालाही माहित आहे की, आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात अगदी वेडे झालो आहोत आणि कोणत्या लग्नात प्रॉब्लेम नसतात.”

पूनम 2011 मध्ये देखील खूप चर्चेत आली होती. जेव्हा ती म्हणाली होती की, “जर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला, तर मी न्यूड होईल.” एवढंच नाही तर माध्यमांतील वृत्तानुसार, पूनम पांडेने या संदर्भात बीसीसीआयला एक पत्र देखील लिहिले होते.

पूनमने ‘नशा’, ‘आ गया हीरो’, ‘द जर्नी ऑफ कर्मा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सारी नॉट सॉरी’, म्हणत प्रिया बापटने दाखवल्या साडीतील ग्लॅमरस अदा; एक नजर टाकाच

-रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी पन्नू; सोशल मीडियावर रंगलीये चांगलीच चर्चा

-क्या बात है! ८५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी पाण्यात केले एरोबिक्स, तरुणाईलाही लाजवेल त्यांचा ‘हा’ उत्साह


Leave A Reply

Your email address will not be published.