Monday, July 1, 2024

उगाच नाही म्हणत हिला ड्रामा क्वीन… प्रसिद्धी साठी स्वतःला केलं होतं विवस्त्र!

आपण जर बिग बॉस चे चाहते असाल तर आर्शी खान हिला तर चांगलेच ओळखत असाल. बिग बॉसच्या ११ व्या पर्वात धुमाकूळ घातल्यानंतर बिग बॉसच्या १४ व्या पर्वात या मॅडम पुन्हा आल्या आहेत. जेव्हा पासून ती बिग बॉसमध्ये आली आहे तिथून ती चर्चेत राहिली आहे. मुळात तिला चर्चेत राहणंच आवडतं. यासाठी मग वाद घालावे लागले, स्टंट करावे लागले तरी चालतील. आर्शी सोबत अनेक कॉन्ट्रोव्हर्सिज जोडल्या गेल्या आहेत.

लाईमलाईट मध्ये येण्यासाठी या मॅडम ने स्वतःला पाक क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची प्रेयसी असल्याचं संगीतल होत. पण हे दुसरं तिसरं काहीही नसून फक्त एक पब्लिसिटी स्टंट निघाला होता. असं स्वतः आर्शिने कबूल केलं.

२०१६ मध्ये पुन्हा एकदा ही अभिनेत्री चर्चेत आली होती. तिने शाहिद आफ्रिदी आणि भारतीय संघासाठी कपडे काढले होते. याशिवाय आर्शी तिच्या न्यूड फोटोजना घेऊनही चर्चेत असते. अर्शी खानने राधे माँवर सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता. तिचं हे विधान बरंच गाजलं होतं.

आर्शीचा आणि राखी सावंतचादेखील वाद आहे. खरंतर राखी तिची बेस्ट फ्रेंड आहे की नाही, असे एका अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये अर्शीला विचारले गेले होते. अर्शीने नकार दिला. त्यानंतर राखी खूप चिडली होती. बिग बॉस 14 च्या प्रीमिअरच्या वेळी राखीने ही गोष्ट सांगितली होती.

विकास गुप्ताबरोबर बआग बॉसच्या घरातही आर्शीचे वाद पाहायला मिळाले. आर्शीने विकासवर तिचं काम हिसकावल्याचा आरोप केला. सोमवारी एपिसोडमध्ये आर्शी विकासच्या कुटूंबाबद्दल बोलली. यानंतर आपला संताप गमावून विकासने अर्शीला स्विमिंग पुलमध्ये ढकललं. याचं परिणामस्वरूप विकास घराबाहेर पडला.

अशा या ड्रामा क्वीन आर्शीचा जन्म अफगाणिस्तानात झाला आहे. जेव्हा ती फक्त चार वर्षांची होती, तेव्हा तिचं कुटुंब भारताच्या मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ शहरात स्थायिक झालं होतं.

हे देखील वाचा