Wednesday, February 5, 2025
Home मराठी रुपाली भोसलेच्या ‘गुलाबी सौंदर्या’वर चाहते फिदा; साडी लूकला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

रुपाली भोसलेच्या ‘गुलाबी सौंदर्या’वर चाहते फिदा; साडी लूकला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

मराठी ‘बिग बॉस’चं दुसरं पर्व खूपच गाजलं होत. या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार सामील झाले होते.‌ यामध्ये प्रेम, मस्ती, विनोद, मनोरंजन, डान्स, गाणी या सगळ्या गोष्टींचा प्रेक्षकांनी अगदी भरभरून आनंद घेतला होता. यातील स्पर्धक देखील खूप अतरंगी होते. यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुपाली भोसले होय. रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. रुपाली सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही नवीन लूकमधील फोटो समोर आले आहेत.

रुपालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने साडी नेसलेली आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातलेले आहे. तसेच हातात हिरवा चुडा भरलेला आहे. हातावर मेहेंदी काढलेली आहे, तसेच केसांची वेणी घातली आहे. या सगळ्या साज शृंगारत रुपाली खूपच सुंदर दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे तिचा हा लूक ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आहे. (Bigg boss fame Rupali bhosale’s photo viral on social media)

तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. याआधी देखील रुपालीचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या सगळ्या फोटोला तिच्या चाहत्यांना जोरदार प्रतिसाद दिला आहे.

रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण ‘बिग बॉस’ने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे ‘संजना’ नावाचे पात्र चांगलेच गाजले. नकारात्मक भूमिकेत असूनही तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा