‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमधून बाहेर पडलेल्या अनेक कलाकारांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. हे कलाकार नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मात्र, ‘बिग बॉस ओटीटी’मधील स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या फॅशन सेन्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. नुकतेच तिने आपल्या विचित्र फॅशनने सोशल मीडियाचे लक्ष वेधले आहे.
रिंग ब्रालेट परिधान करून दिले पोझ
खरं तर, उर्फी जावेदने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोमध्ये उर्फीने ऍनिमल प्रिंटेड ब्रालेट आणि कमरेवर त्याच प्रिंटचा स्कार्फ गुंडाळला आहे. या आऊटफिटमध्ये उर्फीचा परफेक्ट फिगर दिसत आहे. (Bigg Boss Fame Urfi Javed Made A Demand By Wearing A Ring Bralette People Said And There Are No Short Clothes)
चाहत्यांना केली ही मागणी
या फोटोंमध्ये उर्फी बीच लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला गोव्याला जायचे आहे. नेहमीच बीच बेबी.” तसेच, तिने कॅप्शनमध्ये पुढे “कमेंटमध्ये आपले आवडते बीच ठिकाण लिहा,” असे लिहिले आहे.
तिच्या या पोस्टवर युजर्स एकीकडे गोवा, मालदीव, बाली यांसारख्या बीचचे नावे लिहित आहेत. दुसरीकडे काही युजर्सनी पुन्हा एकदा उर्फीच्या लहान कपड्यांवर निशाणा साधत तिला ट्रोल केले आहे. एकाने लिहिले की, “अजून छोटे कपडे नाहीत का?” तसेच, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “छोट्या कपड्यांनी नाव कमावत आहे.”
बॅकलेस अवतारातही दिसत होती ग्लॅमरस
उर्फीने मागील काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत उर्फीचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला.
उर्फीबाबत बोलायचं झालं, तर तिला ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात फार चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र, घरातून बाहेर झाल्यानंतर ती आपल्या फॅशनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्यास मात्र चुकत नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न










