Friday, July 5, 2024

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये घालण्यासाठी उधारीने आणलेले कपडे, खुद्द उर्फीनेच केलाय खुलासा

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा अतरंगी ड्रेसिंग सेन्स पाहून लोकांना विचार करण्यास भाग पाडते. काच, पोते, प्लास्टिक, ब्लेड अशा वस्तूपासून आपला आऊटफिट तयार करून तिने हद्दच पार केली होती. मात्र, तिच्या या ड्रेसिंग सेन्सची काही सेलिब्रिटींनीही प्रशंसा केली होती. तसेच, काहींनी तिला जोरदार ट्रोलही केले होते. यावेळेस तिने आपल्या फॅशन सेन्सने नाही, तर आपल्या धक्कादायक खुलाशाने लोकांना हैराण केले आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या फॅशन सेन्समुळे तर नेहमीच चर्चेत, पण यावेळेस तिने आपल्या आयुष्यातील असा काही किस्सा सांगितला आहे, जो जास्त लोकांना माहिती नाही. उर्फी जावेद पहिल्यांदाच मुंबईत आल्यावर तिच्याकडे राहण्यासाठी घर देखील नव्हते. ती खूप कठीण परिस्थितीतून पुढे आली आहे. यासोबतच तिने एका मुलाखतीत ‘बिग बॉस ओटीटी’चाही धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

तिने या मुलाखतीत सांगितले की, “8 वर्षांपर्यंत माझ्याकडे लोकांचे खूप कर्ज होते, त्यामुळे मला गरीब परिस्थितीत राहावे लागले होते.” जवळ पैसे नसल्याने उर्फी जावेदला खूपच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. मात्र, बिग बॉस ओटीटी हा तिच्या आयुष्याटील टर्निग पॉईंट बनला होता.

नेहमी आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने ‘बिग बॉस ओटीटी’चा किस्सा सांगताना म्हटले की, “बिग बॉस ओटीटीमध्ये असतानाही माझ्याकडे पैसे नव्हते. या कार्यक्रमात घालण्यासाठी उधारीचे कपडे घेऊन आले होते.” या कार्यक्रमातही तिला फार काही पैसे कमवता आले नाही. कारण ती फक्त एक आठवडाच या कार्यक्रमाचा भाग होती. मात्र, तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

यानंतर उर्फी जावेद आपल्या ड्रेसिंग सेन्सने सोशल मीडियावर ‘सेन्सेशन’ बनली आहे. अशाही चर्चा होत्या की, उर्फी चर्चांमध्ये राहण्यासाठी मीडियाला पैसे देत आहे. यावर उर्फीने हसत हसत उत्तर दिले आहे की, “माझ्याकडे एवढे पैस नाहीयेत.” तिच्या ड्रेसिंग सेन्सला लोकांनी कितीही ट्रोल केले, तरी उर्फीचे काही बॉलिवूड सेलिब्रिटी फॅन आहेत. रणवीर सिंगने एका कार्यक्रमात तिची प्रशंसाही केली होती. उर्फी नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असते. तिचे चाहतेही तिला नवीन अंदाजात बघण्यासाठी उत्सुक असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रुपेरी पडद्यावर एलिझाबेथ राणी बनत ‘या’ अभिनेत्रींनी लुटली वाहवा, एकीची ‘गिनीज बुक’मध्ये झालीय नोंद
पोपटलालला मिळेना बायको, पण शोमधील ‘हा’ कलाकार साखरपुडा होऊनही अनेक वर्षांपासून अविवाहित
‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण

हे देखील वाचा