Friday, November 22, 2024
Home अन्य ‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल, ‘या’ अभिनेत्रीसोबत बोल्ड स्टाईलमध्ये केला रोमान्स

‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ व्हायरल, ‘या’ अभिनेत्रीसोबत बोल्ड स्टाईलमध्ये केला रोमान्स

‘बिग बॉस ११’ आणि ‘बिग बॉस १४’चा स्पर्धक मास्टरमाइंड विकास गुप्ताची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कोणत्याही चांगल्या कारणाऐवजी तो वादांमुळे चर्चेत राहत असतो. विकास गुप्ता हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ आहे. आता विकासचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विकास एका मुलीसोबत दिसत आहे. अशा परिस्थितीत ही मुलगी कोण आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत.

विकास गुप्ताचा व्हायरल व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या विकासच्या रोमँटिक व्हिडिओमध्ये तो चेतना पांडेसोबत दिसत आहे. विकास चेतन्याच्या मागे बसलेला दिसत आहे. चेतना पांडे ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीची अभिनेत्री आहे. चेतना आणि विकास खूप जवळचे मित्र आहेत आणि अशा परिस्थितीत विकास अनेकदा तिच्यासोबत व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतो. या व्हिडीओमध्ये दोघेही एकदम जवळ येताना दिसत आहेत. चेतना पांडेसोबत व्हिडिओ शेअर करताना विकासने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासाठी पुढे जा.”

चेतना पांडेसोबत झाला रोमँटिक
काही दिवसांपूर्वी विकास आणि चेतना यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. ज्यावर दोघांनीही दोघे चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. तसे, विकास अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. ‘बिग बॉस’च्या घरातही त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. घराबाहेर पडल्यानंतरही तो बिनधास्तपणे आयुष्याबद्दल सांगत असतो.

https://www.instagram.com/p/COnJt7KrHHH/?utm_source=ig_web_copy_link

प्रत्युषासोबतचे नाते
विकासने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीसोबतच्या नात्याची सत्यता सांगितली. विकासने सांगितले होते की, तो दोन मुलींसोबत रिलेशनशीपमध्ये राहिला आहे. त्यापैकी एक प्रत्युषा बॅनर्जी होती. यानंतर जेव्हा त्याला विचारण्यात आले की, प्रत्युषाला तुझ्या बायसेक्शुअल असण्याबद्दल माहिती होते का? यावर तो म्हणाला, “प्रत्युषाला हे आमच्या ब्रेकअपनंतर कळले. आम्ही थोड्या काळासाठी एकत्र होतो. काही लोक माझ्याबद्दल प्रत्युषाबद्दल वाईट बोलले होते, परंतु ती आता नाही, म्हणून मला डिटेलमध्ये जायचे नाही.”

कुटुंबाने नाही स्वीकारले
विकासने दावा केला होता की, त्याच्या बायसेक्शुअल असण्यामुळेच त्याची आई आणि भावाने त्याला स्वीकारले नाही. विकास म्हणाला की, “ते का निघून गेले हे त्यांना विचारायला हवे. असे असले तरी, मी माझ्या कुटुंबाला माझ्या आयुष्यातील एका मोठ्या भागापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण माझ्या लक्षात आले आहे की, तुम्ही काही लोकांवर खूप प्रेम करता, पण ते प्रेम तुम्हाला परत मिळत नाही. प्रेम देत राहा आणि जर तुम्हाला ते परत मिळालं नाही तर माणूस रिकामा होतो. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही असे नाही. काही दिवसांपूर्वी माझे आईवडील माझ्या या घरात राहत होते.”

विकास गुप्ता हा एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचा ‘महाभारत’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘किस देश में है मेरा दिल’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ या शोचा तो क्रिएटिव्ह हेड होता. नंतर, त्याने ‘लॉस्ट बॉय प्रॉडक्शन’ हा स्वतःचा प्रोडक्शन स्टुडिओ सुरू केला. ज्याद्वारे त्याने ‘गुमराह: एंड ऑफ इनोसन्स’, ‘वॉरियर हाई’, ‘कैसी ये यारियां’, ‘वी द सीरियल’, ‘ये है आशिकी’ आणि ‘एमटीव्ही वेब्ड’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ शुक्लाच्या आईला एकटी म्हणणाऱ्या कलाकारांना विकास गुप्ताने धरले धारेवर; म्हणाला…

-राखी सावंतला उचलून घेतल्यामुळे विकास गुप्ता झाला ट्रोल, युजर म्हणाले, ‘आता हे काय नवीन?’

-काम्या पंजाबी- विकास गुप्तावर केस करणार राहुल राज सिंग; म्हणाला, ‘प्रत्युषाला मी नाही, तर…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा