काम्या पंजाबी- विकास गुप्तावर केस करणार राहुल राज सिंग; म्हणाला, ‘प्रत्युषाला मी नाही, तर…’


अभिनयाच्या जगात मागच्या काही वर्षांपासून अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कलाकारांच्या आत्महत्येच्या बातम्या सतत कानावर येत आहे. सदर कलाकार आत्महत्या करतात, मात्र मागे सोडून जाते असंख्य न संपणारे असे प्रश्न. कलाकार आत्महत्या का करतात? हा प्रश्न तर त्यांच्या या मोठ्या पावलानंतर सर्वांनाच पडतो. मात्र याव्यतिरिक्त देखील अनेक प्रश्न उत्तरांच्या प्रतीक्षेत असतात. आत्महत्येनंतर अनेक जण पुढे येऊन एकेमकांवर आरोपप्रत्यारोप करतात, पण सत्य काही समोर येत नाही. कलाकार निघून गेल्यानंतरही अनेक प्रश्न कित्येकवर्ष अनुत्तरितच असतात. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या प्रत्युषा बॅनर्जीचंच बघा.

१०एप्रिल २०१६ ला प्रत्यूषाने आत्महत्या केली. मात्र आज तिच्या जाण्याच्या काही वर्षांनंतरही तिच्या आजूबाजूचे अनेक लोकं नवनवीन खुलासे करताना समोर येत आहेत. त्यात नक्की विश्वास कोणावर ठेवावा, हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ताने तो प्रत्यूषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. मात्र काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्याला तो बाय-सेक्शुअल असल्याचे समजले होते. तर दुसरीकडे प्रत्यूषाचा बॉयफ्रेंड असलेल्या राहुल राज सिंगने दावा केला आहे की, प्रत्युषा विकाससोबत कधीच नात्यात नव्हती.

आज प्रत्यूषाच्या जाण्याच्या पाच वर्षांनंतरही राहुल राज सिंग ही केस बंद होण्याची किंवा त्याला निर्दोष घोषित होण्याची वाट बघत आहे. तत्पूर्वी राहुल राज सिंगवर प्रत्यूषाला आत्महत्येसाठी प्रेरित करण्याचा आरोप आहे. एका मुलाखतीदरम्यान राहुल राज सिंगने याप्रकरणावर अनेक नवनवीन खुलासे केले आहेत. (pratyusha banerjee suicide case rahul raj singh to file defamation case against vikas gupta and kamya punjabi)

त्याने सांगितले की, “प्रत्यूषाने माझ्यामुळे नाही तर तिच्या कुटुंबामुळे आत्महत्या केली आहे. मी आजही त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी कोर्ट मला या केसमध्ये निर्दोष म्हणून जाहीर करेल. मला माहित आहे की, या प्रकरणात मी दोषी नाहीये. मी तिला बिलकुल मारले नाही, तर तिच्या परिवाराने आणि त्यांच्या लोभाने तिला मारले आहे. प्रत्युषा तिच्या परिवाराच्या न संपणाऱ्या अगणित मागण्या पूर्ण करण्यासाठी असमर्थ होती. शिवाय मी काम्या पंजाबी आणि विकास गु्प्ता यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे.”

प्रत्यूषाला आठवताना राहुल पुढे म्हणाला, “मी नेहमीच तिला वाचवायचा प्रयत्न केला आहे. मला आजही २७ मार्च २०१६ ही तारीख त्रास देते. ही तारीख माझ्या डोक्यासोबतच मनावर देखील छापली गेली आहे. मी आजही प्रत्यूषाला विसरू शकलो नाही आणि पुढेही कधीच विसरणार नाही. पण काम्या पंजाबी आणि विकास गुप्ता यांना माझ्यावर केलेल्या आरोपांची किंमत चुकवावी लागेल. त्यांना देखील माहित आहे आणि मला देखील माहिती मी निर्दोष आहे.” असे म्हणत राहुलने मीडियासमोर त्याची बाजू मांडलेली पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.