Wednesday, July 3, 2024

दोनदा काडीमोड घेतल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत जोडले गेले ‘या’ अभिनेत्रीचे नाव

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व सुरू झाल्यापासून स्पर्धक चांगलेच चर्चेत आहेत. घरातील सदस्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. घरातील टास्क तसेच त्यांच्या प्लॅनिंगबाबत तर चर्चा चालूच आहे. याचसोबत काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बाहेरील जगात मोठी चर्चा चालू आहे. यातील एक स्पर्धक म्हणजे स्नेहा वाघ. स्नेहा वाघ ही ‘बिग बॉस’च्या घरात जास्त काही मिक्स होताना आतापर्यंत दिसली नव्हती, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

वैयक्तिक आयुष्यात दोन वेळा संसार मोडल्याने स्नेहा खूप चर्चेत आहे. यातील सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे स्नेहाचा पहिला पती म्हणेज आविष्कार दार्व्हेकर होय. हा देखील बिग बॉसच्या घरात आहे. त्यामुळे त्या दोघांचा नेहमीच सामना होत असतो आणि प्रेक्षकांना चर्चेचा विषय मिळतो. स्नेहा जेव्हा १९ वर्षाची होती, तेव्हा तिने आणि आविष्कारने लग्न केले होते. परंतु नंतर त्यांच्यातील वैयक्तिक कलहामुळे त्यांचा घटस्फोट झाला. स्नेहाने पहिल्या घटस्फोटानंतर तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. स्नेहाने इंटेरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत लग्न केले होते. परंतु त्यांच्यात वैयक्तिक कलह झाले आणि लग्नाच्या आठ महिन्यांनंतर ते विभक्त झाले. (Bigg Boss Marathi 3 contestant sneha wagh’s relation with boy who is 11 years younger than her)

यानंतर स्नेहाचे नाव आणखी एका अभिनेत्यासोबत जोडले गेले होते. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या स्नेहाचे आयुष्य सध्या चर्चेत आहे. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर स्नेहाचे नाव अभिनेता फैजल खान याच्यासोबत जोडले गेले होते. फैजल हा स्नेहापेक्षा तब्बल ११ वर्षांनी लहान आहे. त्या दोघांनी एका मालिकेत एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती, पण सोशल मीडियावर मात्र त्यांच्यात रिलेशन होते अशी चर्चा रंगली होती. शिवाय फैजलचे पहिले ब्रेकअप झाले, तेव्हा देखील त्या ब्रेकअपला स्नेहा जबाबदार होती अशा देखील बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो व्हायरल होत होते. अशातच स्नेहा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आल्यापासून तिचे आयुष्य सर्वांच्या समोर आले आहे.

तिचा पहिला पती त्याच घरात असल्याने २४ तास त्यांना एकमेकांचा सामना करावा लागत आहे. आविष्कारच्या एकंदरीत वागण्यावरून असे जाणवत आहे की, त्यांच्या नात्याबाबत अजूनही तो सकारात्मक विचार करत आहे. त्याने घरात एक प्रेम कविता देखील साजरी केली होती. मात्र, स्नेहा त्याला कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच त्याने जयला सांगितले होते की, स्नेहासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो दारूच्या आहारी गेला होता. आता आविष्कार आणि स्नेहाचे नाते घरात पुढे कसे चालणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

-मित्राकडून उसने पैसे घेऊन केला पहिला सिनेमा, आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शक, आहेत महेश कोठारे

हे देखील वाचा