Tuesday, July 9, 2024

अरेरे! ‘बिग बॉस मराठी ३’मधून तृप्ती देसाईंची एक्झिट, इतर स्पर्धकांना अश्रू अनावर

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी ३’ होय. या शोने सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन केले होते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेतला होता. आता हा शो आपल्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना दिसत आहे. अशातच आता या शोमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी ३’मधून बाहेर पडल्या आहेत. त्यांनी या शोमध्ये सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. मात्र, आता ४९ दिवसांनंतर तृप्ती यांची शोमधून एक्झिट झालीय. यावेळी इतर स्पर्धकांच्याही डोळ्यात अश्रू होते. स्वत: सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनाही याचे वाईट वाटले.

तृप्ती घराबाहेर पडल्याने चाहते आणि घरातील इतर स्पर्धकांनाही धक्का बसला असून ते भावुक झाले. महेश मांजरेकर तृप्तींबद्दल बोलताना म्हणाले की, त्या ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातील सर्वात चांगल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. (Bigg Boss Marathi 3 Elimination Contestant Trupti Desai Gets Emotional)

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी तृप्तींनी घरातील सर्व मित्रांना मिठी मारली. दादूस, गायत्री दातार, मीरा जगन्नाथ आणि उत्कर्ष शिंदे या घरातील तिचे मित्र तृप्तीचा निरोप घेताना अस्वस्थ झाले. तृप्ती देसाईंबद्दल सांगायचे, तर त्यांनी ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सर्वात मजबूत स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. सामाजिक अनियमितता आणि महिलांवरील भेदभावाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.

विशेष म्हणजे, ३५ वर्षीय तृप्ती या स्त्री-पुरुष समानता कार्यकर्त्या असून पुण्यातील स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आहेत. तृप्तींचा इतर प्रसिद्ध निषेध म्हणजे, स्त्रियांच्या हक्कांसाठी २०१६ चा निषेध. तसेच, २०१८ मध्ये त्यांनी सबरीमाला मंदिरात (केरळमध्ये) प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलकांनी त्यांना रोखले होते. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिराच्या आतील गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशासाठी त्यांनी यशस्वीपणे लढा दिला.

घरातील तृप्ती देसाईंची भावनिक बाजू प्रेक्षकांनी पाहिली आणि त्यांनी शोमधील त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवलीला पाटील आणि सोनाली पाटील यांच्याशी तिच्या शाब्दिक भांडणापासून ते दादूसोबतच्या त्यांच्या बाँडिंगपर्यंत त्यांनी अल्पावधीतच माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते.

मागील आठवड्यात विशाल निकम, तृप्ती देसाई, जय दुधाणे, सोनाली पाटील आणि मीनल शाह हे ५ स्पर्धक नॉमिनेशन टास्कमध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. मात्र, शनिवारी (०६ नोव्हेंबर) विशाल आणि मीनल सुरक्षित असल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात है! पहिल्यांदाच ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर

-‘यामुळे’ जरा थकवा आलाय! अभिनेते खासदार अमोल कोल्हे जाणार एकांतवासात, पोस्ट करुन सांगितले कारण

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार मीराचा भाऊ? तिची अवस्था पाहून इतर स्पर्धकही भावुक

हे देखील वाचा