Thursday, March 28, 2024

क्या बात है! पहिल्यांदाच ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर

सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल, नाही का? का नाही आठवणार, चित्रपटातील जबरदस्त सीन आणि डायलॉग यांनी चाहत्यांना जबरदस्त वेड लावले होते. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी प्रसिद्धी मिळवली. मात्र, सर्वांच्या मनात भरला, तो राहुल पाटील अर्थातच सर्वांचा लाडका अभिनेता ‘ओम भूतकर’ होय. ओमने ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या अंगावर अक्षरश: काटा आणला होता. आता हाच अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ओम भूतकर प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत पहिल्यांदाच ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटात ओम ‘राव’ ही भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर ‘रंभा’ ही भूमिका अभिनेत्री मोनालिसा बागल निभावणार आहे. याव्यतिरिक्त अभिनेते गिरीश कुलकर्णी यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. (Actor Girish Kulkarni And Om Bhutkar Together For The First Time In A Historical Film Ravarambha)

‘रावरंभा’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब हे करत आहेत. याव्यतिरिक्त ‘बेभान’, ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अनुप अशोक जगदाळे यांच्यावर ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाचं लेखन केले आहे.

‘रावरंभा’ हा चित्रपट एक वेगळी कहाणी घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रीत होणारा ‘रावरंभा’ हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात डिसेंबर महिन्यात होणार आहे.

या चित्रपटाच्या कहाणीविषयी बोलायचं झालं, तर ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याती एक अनोखी प्रेमकहाणी आहे. हीच प्रेमकहाणी ‘रावरंभा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘देऊळ’, ‘फास्टर फेणे’ यांसारख्या चित्रपटांमधून गिरीश कुलकर्णी आणि ओम भूतकर यापूर्वी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकले होते. गिरीश आणि ओमने आपल्या जबरदस्त अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या भलामोठा चाहतावर्ग आहे.

असे असले, तरीही त्यांच्यासाठी ‘रावरंभा’ हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. त्यामुळे आता चाहतेही त्यांना एकत्र या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यामुळे’ जरा थकवा आलाय! अभिनेते खासदार अमोल कोल्हे जाणार एकांतवासात, पोस्ट करुन सांगितले कारण

-‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार मीराचा भाऊ? तिची अवस्था पाहून इतर स्पर्धकही भावुक

-‘भगवान के नाम पे मुझे कॅप्टन बना दो’, कॅप्टन्सी टास्कवरून मांजरेकरांनी घरातील सदस्यांना सुनावले खडेबोल

हे देखील वाचा