‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व जोरदार चर्चेत राहिले आहे. या पर्वात अनेक कलाकार आले होते. प्रत्येकाची एक वेगळी ओळख आणि आयुष्य बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांसमोर आले. यातील एक स्पर्धक म्हणजे स्नेहा वाघ. बिग बॉसमध्ये असताना ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. बिग बॉसच्या घरात तिचा पहिला पती आविष्कार दार्व्हेकर देखील आला होता. त्यानंतर ते दोघेही खूप चर्चेत आले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
स्नेहा आणि आविष्कार दोघेही बिग बॉसमधून लवकर बाहेर पडले. घरातून बाहेर आल्यावर स्नेहा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक नवीन लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Bigg Boss marathi 3 fame sneha wagh share her glamorous photos on social media)
स्नेहाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, तिने सुंदर असा लाँग वन पिस घातला आहे. तसेच गळ्यात हिरव्या रंगाची ज्वेलरी घातली आहे. तिने स्मोकी आय मेकअप केला आहे. फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “बिग बॉस मराठी माझ्यासाठी खूप मोठा शिक्षक आहे. या शोने मला फक्त स्वतःला पुन्हा शोधण्यात मदत केली नाही, तर मला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवले. माझ्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल प्रत्येकाचे आभार सगळ्यांना सारांगे.” तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या अनेक चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.
स्नेहाने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘काटा रुते कुणाला’, ‘विरा’, ‘ज्योती’, ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.
हेही वाचा :
विशाल निकमने पंढरपुरात घेतली शिवलीला पाटीलची खास भेट, बिग बॉसमधील शब्द केला खरा
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिरीज आणि चित्रपटांबद्दल घ्या जाणून
…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत