Thursday, March 28, 2024

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सिरीज आणि चित्रपटांबद्दल घ्या जाणून

नवीन वर्षाची दिमाखात सुरुवात झाली. २०२२ मध्ये तरी कोरोना नावाच्या या महामारीचा अंत व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त फटका बसला तो मनोरंजनविश्वाला. अनेक सिनेमे प्रदर्शित होण्यापासून वंचित झाले. मात्र यासर्वांमधे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीज यांनी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले आणि अजूनही करत आहे. या प्लॅटफॉर्मची भुरळ बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांना देखील पडली आणि त्यांनी देखील त्यांचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेक बहुप्रतीक्षित वेबसिरीज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहे. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही सिनेमा आणि वेबसिरीजची नावे.

गेहराईयां :
शकुन बत्रा यांचा दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे अभिनित ‘गेहराईयां’ हा सिनेमा २०२२ वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून ‘गेहराईयां’ची वाट बघतील जात आहे. हा सिनेमा एक रिलेशनशिप ड्रामा असून, जो कॉम्प्लेक्स मॉडर्न रिलेशनशिप, एडल्टिंग आदी अनेक आयुष्यातील गोष्टींवर भाष्य करते. या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर २५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ह्यूमन :
डिज़्नी प्लस हॉटस्टारची नवीन ‘ह्यूमन’ ही लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ह्यूमन’ ही ड्रग ट्रायलवर आधारित मेडिकल थ्रिलर सिरीज असून याची कथा फार्मास्यूटिकल्स आणि ड्रग टेस्टिंग जगाच्या आजूबाजूला फिरते. यात असे दाखवले गेले आहे की, नफा आणि शोध यात अनेकदा बिजनेस आणि तत्व ओव्हरलॅप होते. या सिरीजमध्ये शेफाली शाह, कीर्ति कुल्हारी, विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव आदी कलाकार दिसणार आहेत. ही सिरीज १४ जानेवारी २०२२ रोजी डिज़्नी+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

ये काली काली आंखें :
नेटफ्लिक्सची आगामी थ्रिलर ‘ये काली काली आंखें’ यात नाट्य, रहस्य आणि रोमांस पाहायला मिळणार आहे. श्वेता त्रिपाठी, ताहिर राज भसीन यांची ही सिरीज एका अशा व्यक्तीसोबत फिरते जो एका अतिशय शक्तीशाली राजकीय नेत्याच्या मुलीच्या कचाट्यातून स्वतःला एका अंधाऱ्या, धोकादायक रस्त्यावर घेऊन जातो. ही सिरीज १४ जानेवारी २०२२ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

कौन बनेगा शिखरवती :
झी 5 ची आगामी वेबसिरीज ‘कौन बनेगा शिखरवती’ ही कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण सिरीज आहे. या सिरीजमधून वर्तमान काळातील शाही कुटुंबातील राजकुमाराच्या जीवनात घेऊन जाते. ज्या शिखरवतीचे सिंहासनला मिळवण्यासाठी एक दुसऱ्यांच्या विरोधात उभी राहते. या सिरीजमध्ये नसीरुद्दीन शाह, रघुबीर यादव, सोहा अली खान, लारा दत्ता, अन्या सिंह, कृतिका कामरा, साइरस साहूकार, वरुण ठाकुर आदी कलाकार असून, ही सिरीज ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

कॅम्पस डायरी :
हर्ष बेनीवाल, ऋत्विक सहोर, सलोनी गौर, सलोनी पटेल, अभिनव शर्मा, सृष्टि गांगुली रिंदानी अभिनित ही सिरीज प्रेम मिस्त्री आणि अभिषेक यादव यांनी तयार केली आहे. ही सिरीज एक ड्रामा सिरीज असून, विद्यापीठाच्या मुलांच्या अवतीभवती फिरते. ही सिरीज नक्कीच तुमच्या कॉलेज जीवनातील आठवणींना ताजे करेल. ७ जानेवारी २०२२ रोजी एमएक्स प्लेयर ही सिरीज प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू

अंकिता लोखंडेने रोमॅंटिक अंदाजात केले नव्या वर्षाचे सेलिब्रेशन; काळ्या आउटफिटमध्ये कमाल दिसतेय अभिनेत्री

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ

 

हे देखील वाचा