‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. मागच्याच आठवड्यात घरातील सदस्य ह.भ. प. शिवलीला पाटील हिने घरातून एक्झिट घेतली. आजारी असल्यामुळे ती या घरातून बाहेर गेली आहे. मागच्या आठवड्यात वीकेंडला तिने ही बातमी सगळ्यांना सांगितली. या आधीच ती दोन दिवस घराबाहेर डॉक्टरांच्या डेखरेखीसाठी गेली होती. परंतु वीकेंडला तिने स्वतःच निर्णय घेऊन घराबाहेर गेली. तिच्या या निर्णयामुळे घरातील सगळ्या सदस्यांना तसेच प्रेक्षकांना देखील खूप दुःख झाले आहे.
तसेच या आठवड्यात एलिमिनेशन असणार आहे. तसेच घरातील एक सदस्य आधीच घराबाहेर गेली आहे, पण आता सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे की, बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री वीकेंडला होणार आहे. या व्यक्तीचा अजूनही चेहरा समोर आला नाही. मात्र, अनेकजण हा अभिनेता कोण असेल याचा सगळेजण अंदाज लावत आहेत. (Bigg Boss Marathi 3 : first wild card entry will appear in this weekend)
कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एक पुरुष ‘ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतांश लोकांचे असे मत आहे की, हा आदिश वैद्य आहे.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच आदिश वैद्य या शोमध्ये येण्याची चर्चा चालू होती. परंतु सुरुवातीला तो न दिसल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. परंतु आता तोच या शोमधील वाईल्ड कार्ड स्पर्धक असेल असा सगळेजण अंदाज लावत आहेत.
पण नक्की हा स्पर्धक कोण आहे? याच्या येण्याने घरात काय बदल होणार आहेत? घरात पडलेले गट एकत्र येतील का? की आणखीनच मत भेद होतील हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ! ‘बानू’च्या नजरेच्या बाणाने थेट केला चाहत्यांच्या काळजावर वार, पाहा व्हिडिओ
-कौतुकास्पद! मराठमोळ्या पूजा सावंतने ‘हे’ महत्त्वाचं अभियान घेतलं हाती, फोटो आले समोर
-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा