Tuesday, July 9, 2024

‘बिग बॉसच्या मराठी’च्या महिलांनी ग्लॅमरस अवतारात केले रॅम्प वॉक, एकेकीचा अंदाज पाहून तुम्ही व्हाल घायाळ

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक सूत्र बदलताना दिसतायेत. अनेक जवळची माणसे दूर चालली आहेत. गैरसमज वाढत चालले आहेत. घरातील ‘ए’ ग्रुप या आठवड्यात पूर्णपणे वेगळा झाला आहे. तसेच टास्क दरम्यान देखील खूप भांडणं झाल्याची पाहायला मिळाली आहे. या सगळ्यात घरात दिवाळी साजरी झाली आहे. घरातील सदस्यांनी मस्त तयार होऊन ही दिवाळी साजरी केली आहे. अशातच घरात एक भन्नाट रॅम्प वॉक झाला आहे.

‘बिग बॉस’ने ट्रेस्मी या प्रॉडक्टचे प्रमोशन करण्यासाठी एक स्पर्धा घेतली. यात घरातील चार महिलांना या ब्रॅंडच्या मॉडेल बनवल्या होत्या. त्यांना ट्रेस्मीचे प्रोडक्ट्स वापरून त्यांचा केसांना फॉन्ड करत रॅम्प वॉक करायचा असतो. यात सोनाली, मीनल, निथा आणि मीरा यातील मॉडेल असतात. तृप्ती, गायत्री आणि स्नेहा या त्यांचे परीक्षण करणार असतात. त्याचप्रमाणे विशाल, विकास आणि जय यांनी मिळून कोणाला कोणते नाव द्यायचे हे ठरवायचे असते, तर उत्कर्ष हा या शोचे सूत्रसंचालन करतो. (Bigg Boss Marathi 3 : girls are on flour and dance )

यावेळी घरातील या चार मॉडेल अत्यंत ग्लॅमरस अवतारात मंचावर अवतरल्या होत्या. तसेच परीक्षकांनी त्यांना मजेशीर प्रश्न देखील विचारले. सगळ्या मॉडेलने अत्यंत सुंदर डान्स केला. यावेळी सोनालीला मिस ड्रामा क्वीन, निथाला मिस कन्फ्युज, मीनलला मिस खिलाडी असे किताब देण्यात आले होते. सगळ्यांनी ही खूप चांगला परफॉर्मन्स दिला. तसेच परीक्षकांनी निथा शेट्टीला बेस्ट परफॉर्मरचा अवॉर्ड दिला. या सोबत उत्कर्षने त्याच्या सूत्रसंचालनने या शोला चार चाँद लावले.

या आठवड्यात घरातील सदस्यांनी खूप राडे घातले आहेत. बिग बॉस ने वारंवार सूचना देऊन कोणीही त्यांच्या सूचनांचे पालन केले. तसेच या आठवड्यात स्नेहा कॅप्टन होती. त्यामुळे घरातील सगळा कारभार तिचं सांभाळत होती. घरातील सदस्यांनी टास्कदरम्यान आक्रमकता दाखवल्याने बिग बॉसने विकास, विशाल, जय, दादूस, उत्कर्ष, सोनाली यांना टास्कमधून बाहेर काढले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा