Monday, June 9, 2025
Home मराठी ‘बिग बॉस मराठी ३’चं मराठमोळं घर पाहिलं का? पसरलंय तब्बल १४००० चौरस फूटांमध्ये

‘बिग बॉस मराठी ३’चं मराठमोळं घर पाहिलं का? पसरलंय तब्बल १४००० चौरस फूटांमध्ये

गेल्या दोन वर्षापासून टेलिव्हिजन प्रेक्षकांना एका शोची आस लागली आहे. तो शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी ३’ होय. हा शो सुरू होण्यास अवघा एक दिवस शिल्लक आहे. बिग बॉस प्रेमी या शोची आतुरतेने वाट बघत आहेत. या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक असणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या शोमधील आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे बिग बॉसचे घर. या शोमध्ये दरवर्षी काहीतरी थीमनुसार घर डिझाइन केलेले असते. तसेच १०० दिवस स्पर्धक एकाच जागी राहणार असल्याने स्पर्धकांना नेहमी प्रसन्न वाटेल असे हे घर बनवलेले असते. मागील २ वर्ष हे घर खूप सुंदर पद्धतीने डिझाइन केले होते, पण आता यावर्षी हे घर कसे असणार आहे? हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अशातच बिग बॉसच्या घरातील एक झलक पाहण्यासाठी मिळाली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या भव्य घराचे दर्शन झाले आहे. यावर्षी १४००० चौरस फूटामध्ये बिग बॉसच्या घराचे डिझाइन करण्यात आले आहे. यावर्षी १४ लोकप्रिय सदस्य या घरामध्ये राहणार आहेत. दर वर्षीप्रमाणे घरच्या मध्यभागी अंगण आणि ऍक्टिविटी एरिया असणार आहे. घरात अनेक मराठमोळ्या गोष्टींचा वापर केला आहे. घरातील प्रत्येक वस्तूतून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. घरामध्ये ६० पेक्षाही जास्त कॅमेरे आहेत. तसेच शोचे होस्ट महेश मांजरेकर यांना स्पर्धकांना संवाद साधण्यासाठी एक उत्कृष्ट सेट तयार केला आहे. (Bigg Boss Marathi 3 house reveals on social media)

यावर्षी वीकेंडच्या डावाला चावडीचे स्वरूप देण्यात आले आहे. ‘बिग बॉस मराठी’ तिसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले की, “मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. प्रत्येकजण या वादळाला मोठ्या धीराने सामोरे गेले आणि अजूनही जात आहे. या सगळ्यामध्ये आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी परत येतोय महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचा नवा सिझन‌ घेऊन. बिग बॉस मराठीच्या येण्याने मी आशा करतो काही क्षणासाठी का होईना प्रेक्षकवर्ग त्यांचं दु:ख विसरेल. एका वर्षानंतर बिग बॉस मराठीचा नवा सिझन येत आहे उत्सुकता तर नक्कीच आहे. मला खात्री आहे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मी सहभागी स्पर्धकांना या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो.”

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरू होणार आहे.

दोन वर्षापासून जगभरात कोरोना महामारी चालू असल्यामुळे हा शो सुरू झाला नव्हता, पण या वर्षी जेव्हा या शोचा प्रोमो समोर आला, तेव्हापासून बिग बॉस प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

-स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास

हे देखील वाचा