Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

स्वतः जवळील दोन वस्तूंचा त्याग की जयला पाठिंबा, कॅप्टन्सी कार्यात काय असेल मीराची निवड?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक नवीन टास्क पाहायला मिळत आहे. कोणी या टास्कमध्ये जिंकतात तर काही मात्र हताश होतात. प्रत्येक नवीन दिवस घरातील सदस्यांसाठी एक नवीन चॅलेंज घेऊन येत आहे. अशातच घरात येऊन स्पर्धकांना आठ आठवडे झाले आहेत. अनेकजण चांगले खेळत आहेत तर अनेकांनी अजूनही त्यांचा खेळ दाखवला नाही. घरात कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. साप्ताहिक कार्यात विजय मिळवून विशाल निकम आणि जय दुधाने हे कॅप्टन्सी टास्कचे उमेदवार झाले आहेत. घरातील साप्ताहिक कार्य जरी सोप्पे वाटले असले, तरीही कॅप्टन्सी टास्कमध्ये चांगलाच गोंधळ होणार आहे. यावेळी कॅप्टन्सी टास्क काही वेगळ्या पद्धतीने घेतला जाणार आहे. यात उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी इतर सदस्यांना त्यांच्या जवळील काही गोष्टींचा त्याग करवा लागणार आहे. (Bigg Boss Marathi 3 : meera jagnnath can sacrifice her soft toy and family photo for supporting jay?)

यात जयला पाठिंबा देण्यासाठी मीरा पुढे येते तेव्हा बिग बॉस तिला सांगतात की, जयला‌ जर तिला पाठिंबा द्यायचा असेल, तर तिला तिच्या जवळील दोन वस्तूंचा त्याग करावा लागणार आहे. यावेळी तिची जवळील पहिली गोष्ट असते तिचे सॉफ्ट टॉय म्हणजेच तिचा अप्पू. अप्पूसोबत मीरा नेहमीच गप्पा मारताना दिसते. तसेच तिची दुसरी गोष्ट ते तिला देतात ती असते तिच्या भावा आणि बहिणीचा त्यांच्या लहान मुलांसोबतचा फोटो. हे पाहून मीरा खूप रडायला लागते. दोन्ही अत्यंत जवळच्या गोष्टी असल्याने ती संभ्रमात आहे. ती बेडवर जाऊन खूप रडत असते.

आता मीरा जयला पाठिंबा देण्यासाठी तिच्या जवळच्या दोन गोष्टींचा त्याग करेल का? की तिच्या वस्तुंसाठी जयचा पाठिंबा काढून घेईल हे बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा