Friday, April 25, 2025
Home मराठी भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची आख्या महाराष्ट्रभर जोरदार चर्चा चालू आहे. घरातील सदस्यांनी राडे, भांडण करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. घरात अनेक नवीन घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. अभिनेता आदिश वैद्य हा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला होता. परंतु त्याला प्रेक्षकांचे प्रेम कमी मिळाल्याने दोन आठवड्यातच तो घराबाहेर गेला. त्याच्या जाण्याने सगळ्यांना दुःख झाले होते. कारण कमी दिवसात त्याने खूप मोठा चाहतावर्ग बनवला होता. तसेच घरातील अनेकांची मने त्याने जिंकली होती.

अशातच घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. ‘बिग बॉस’च्या कालच्या एपिसोडच्या शेवटी घरात एक वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे असे समजत आहे. ही वाईल्ड कार्ड एन्ट्री एक मुलगी असणार आहे. कालचा एपिसोड बघितल्यानंतर ती व्यक्ती नक्की कोण असेल असा प्रश्न सगळ्यांच पडला आहे. (Bigg Boss Marathi 3 : neetha shetty is second wild card entry in BBM 3)

हाती आलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री अभिनेत्री नीता शेट्टी ही आहे. तिच्या कुरळ्या केसांमुळे प्रेक्षकांनी बऱ्यापैकी अंदाज लावला होता. परंतु नक्की कोण असेल याची खात्री अनेकांना नव्हती. अभिनेत्री नीता शेट्टी हिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.

https://www.instagram.com/p/CVnxI5_rx-W/?utm_medium=copy_link

नीताने ‘तुम ना जाओ काहा’, ‘गंदी बात’, ‘सांसें’, ‘तेनालीराम’, ‘घर की लक्ष्मी’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘फुगे’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेस’, ‘तुला कळणार नाही’ या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. नीताचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सगळेजण आता ती या खेळात कशी खेळणार आहे याची उत्सुकता लागली आहे. तसेच ती कोणत्या टीममध्ये जाईल?बाहेरील जगात काय चाललं आहे हे सांगेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित राहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

हे देखील वाचा