छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त लोकप्रिय असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ होय. या शोमध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात या शोमध्ये ‘बीबी कॉलेज’ हा टास्क झाला. घरातील सगळ्या सदस्यांनी हा टास्क खूप उत्तमरीतीने खेळला. तसेच सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय केल्या. परंतु कॅप्टन्सी टास्क दरम्यान पुन्हा एकदा घरात राडे आणि भांडण पाहायला मिळाली. तसेच नवरात्र चालू असताना घरातील सदस्यांसाठी बिग बॉसने गरबा नाईटचे देखील आयोजन केले होते. यात घरातील महिलांनी पास घेऊन खूप मस्ती केली. याचप्रमाणे वीकेंड देखील एकदम मस्त गेला आहे.
वीकेंडला घरातील जे सदस्य चांगले वागले होते, त्यांचे मांजरेकरांनी भरभरून कौतुक केले. परंतु ज्यांनी चुकीची वर्तवणूक केली, त्यांची मात्र मांजरेकरांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशातच घरामध्ये बीबी कॉलेजचे मागच्या वर्षी टॉपर म्हणजेच नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांचे खास आकर्षण म्हणून स्वागत झाले. त्यांच्या येण्याने घरातील सदस्यांना खूप आनंद झाला. याचबरोबर सगळे खूप उत्साहित दिसत होते. (bigg boss marathi 3 : neha shitole and shiv thakre enter in bb hause as a guest)
घरात आल्यावर नेहा आणि शिवने सगळ्यांना काही सल्ले दिले. तसेच घरात आनंदाने तसेच आपुलकीने राहा असे सांगितले. नेहा म्हणाली की, “तुम्हाला जे करायचं ते करा पण प्रत्येक क्षण एन्जॉय करा. कारण हे दिवस तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही.” यासोबत त्यांनी जय आणि मीरा यांच्या खेळाचे कौतुक केले. तसेच त्यांची केवळ एकच बाजू प्रेक्षकांना दिसत आहे असे सांगितले. यासोबत त्यांनी घरात एक छोटासा टास्क देखील घेतला. यात घरातील सदस्यांना इतर दोन सदस्यांना लाल किंवा काळ्या रंगाचा गुलाब देऊन ते का देत आहेत याचे कारण स्पष्ट करायचे होते. घरातील सदस्यांनी देखील हा खेळ खूप एन्जॉय केला. तसेच या आठवड्यात घरातून सुरेखा कुडची यांचे इलिमिनेशन झाले आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप दुःख झाले. त्यांच्या जाण्याने सगळेच रडत होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी