Tuesday, July 9, 2024

‘काय फालतुगिरी आहे’, सोनालीच्या ‘या’ वाक्यामुळे मीराचा उडाला भडका, आपटला जेलचा दरवाजा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून आपण अनेक सदस्यांमध्ये वाद पाहिले आहेत. त्यात मीराने, तर घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत पंगा घेतला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमीच बिग बॉसच्या घरातील चर्चेचा विषय राहिली आहे. सोनाली आणि मीराला अनेकवेळा भांडताना पाहिले आहे. अशातच पुन्हा एकदा सोनाली आणि मीरामध्ये खटके उडाले आहेत.

यावेळी मीरा आणि सोनालीचे भांडण जोरदार झाले आहे. मीरा घरात कोणताही तिखट पदार्थ खात नाही. तसेच घरात पोहे आणि उपमा हे पदार्थ खायला देखील तिला आवडत नाही. सोनाली नाश्ता बनवताना पोहे बनवते. तेव्हा मीराने पोहे खूप तिखट झाले आहेत आणि मी खाणार नाही असे सांगते. यावर सोनाली तिला फळं खा असे सांगते. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between sonali patil and meera jagnnath)

यावर तिला नाश्ता देत नाहीत म्हणून मीरा खूप चिडते आणि बाहेर येऊन आरडा-ओरड करते. यानंतर सोनाली देखील चिडते आणि बोलायला लागते की,” हिची ही रोजची नाटकं आहेत. काहीही केलं तर हिला पटत नाही. मी नीट सांगितलं होतं ना? काय फालतुगिरी चालू आहे.” हे ऐकून मीराचा अगदी भडका उडतो आणि ती मोठमोठ्याने ओरडू लागते. ती म्हणते की, “मी ऐकून घेते म्हणून ही काहीही बोलते का? सोनाली तू जरा नीट बोल माझ्याशी.”

यावर ती खूप आरडाओरडा करते आणि चीडचीड करते. तसेच गायत्री तिला समजावायला जाते, तर ती गायत्रीला देखील ढकलते आणि मला समजवायला येऊ नको असे म्हणते. तसेच जेलचे दार देखील जोरात आफटते. त्यांचे हे भांडण शांत झाल्यावर सोनाली येऊन तिला काय बनवू खायला असे विचारते , तेव्हा मीरा तिला मला तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आणि माझ्यासाठी काही बनवू देखील नको असे सांगते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा