‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व या वर्षी चांगलेच चर्चेत राहिले आहे. शोमध्ये अनेक वळणं आली. अनेक स्पर्धक घराबाहेर गेले. अशातच घरात ७ स्पर्धक शिल्लक राहिले होते. अशातच घरात आणखी एक एलिमिनेशन झाले आहे. या आठवड्यात सगळ्यांची लाडकी स्पर्धक सोनाली पाटील घरातून बाहेर गेली आहे. सोनालीने घरात तब्बल ९० दिवसापेक्षाही जास्त दिवस प्रवास केला आहे. यावेळी ती सेफ होईल असे अनेकांना वाटत होते. परंतु तिला कमी व्होट मिळाल्याने ती घराबाहेर गेली आहे.
या आठवड्यात विकास, उत्कर्ष, सोनाली आणि जय स्पर्धक नॉमिनेट होते. त्यांच्यात सोनालीला सगळ्यात कमी व्होट मिळाले आहे आणि ती घराबाहेर गेली आहे. यावेळी एलिमिनेशन वेगळ्या पद्धतीने केले. घरात स्पर्धकांच्या बॅग्स पाठवल्या आणि बॅगेत ज्या स्पर्धकांचे कपडे असतील, तो या आठवड्यात घराबाहेर जाणार होता. यावेळी बॅगेत सोनालीचे कपडे होते, त्यामुळे ती घराबाहेर गेली. (bigg boss marathi 3 sonali patil eliminate from bbm house)
सोनाली ही घरात कोल्हापूरचा ठसका देणारी स्पर्धक होती. सुरुवातीपासूनच घरात सोनाली, विकास, विशाल आणि मीनल यांचा ग्रुप होतो आणि तो ग्रुप शेवटपर्यंत टिकला आहे. त्यांच्यात अनेक मतभेद झाले, भांडण झाली परंतु त्यांची मैत्री तुटली नाही. नेहमीच त्यांची भांडण विसरून एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देखील त्यांचा ग्रुप खूप आवडत होता.
या आठवड्यात ती बाहेर गेल्याने तिच्या चाहत्यांना आणि घरातील स्पर्धकांना देखील खूप वाईट वाटले आहे. घरातून बाहेर येताना विकास, विशाल आणि मीनलचे डोळे पान्हावले होते. तसेच ती घराबाहेर आल्यावर तिला बिग बॉसच्या घरातील संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला.
बिग बॉसचा ग्रँड फिनाले २६ डिसेंबर रोजी होणार आहे. विशाल याला तिकीट तो फिनाले मिळाले आहे. त्यामुळे आता बाकी ५ स्पर्धकांपैकी ४ जण टॉप ५ मध्ये पोहचणार आहेत. या आठवड्याच्यामध्ये आणखी एक एलिमिनेशन होणार आहे.
हेही वाचा :
‘या’ कलाकारांनी त्याच्या अभिनयाने गाजवले २०२१ हे वर्ष, जाणून घ्या त्यांची नावे
चिंतेत असलेल्या अनुष्का अन् विराटने मीडिया अन् चाहत्यांकडे केली ‘ही’ विनंती, पोस्ट व्हायरल