‘तुमचा पत्ता कधीही कट होऊ शकतो’ म्हणत, विशालने उघड केले विकास पाटीलबाबत मोठे गॉसिप


‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व संपण्यास आता काहीच दिवस राहिले आहेत. हा शो आता जास्तच रंगतदार होऊ लागला आहे. बिग बॉसच्या घरात याच पर्वातील एलिमिनेट झालेले तीन सदस्य पुन्हा घरात आले आहे. घरात स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई हे सदस्य आले आहेत. तसेच या आठवड्यात घरात हुकूमशाही टास्क चालू झाला आहे. घरात तृप्ती, आदिश आणि स्नेहा हे हुकूमशाह आहेत. ते घरातील सगळ्या सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत. जे त्यांना पूर्ण करताना नाकीनऊ येत आहेत.

अशातच घरात गॉसिपिंगचा एक टास्क झाला. या टास्कमध्ये घरातील सदस्य इतर सदस्यांबद्दल घरात कोणाला माहित नसणाऱ्या गोष्टी सांगत असतात. हा खेळ आता आणखी कठीण होत चालला आहे. कालपर्यंत एकमेकांशिवाय राहू न शकणारे मित्र आता या खेळासाठी एकमेकांच्या विरोधात जात आहेत. (Bigg Boss Marathi 3 : Vishal nikam told gossip about vikas patil)

अशातच विशाल निकम याने त्याचा जवळचा मित्र विकास पाटीलबाबत गॉसिप सांगितले आहे. खास गोष्ट म्हणजे हे गॉसिप त्यांच्या मैत्रिणी सोनाली पाटील आणि मीनल शाह यांच्याबद्दल आहे. त्यावेळी विशाल म्हणतो की, “आपल्या घरातला महारथी जो स्वतःला समजतो की, मी बोलण्याचा बादशहा आहे. तो म्हणजे वन अँड ओन्ली विकास पाटील. त्यांचा शेवटच्या घडीला एकच प्लॅन आहे. हे एवढं मोठ गॉसिप नाहीये, परंतु हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचं मागील तीन-चार दिवसांपासून हेच चालले आहे की, कशाप्रकारे सोनाली पाटील आमच्या दोघांमध्ये येणार नाही आणि त्याचं असं म्हणणं आहे की, सोनाली पाटीलचा एवढा विचार कशाला करतो.” हे ऐकून सोनालीच्या भुवया उंचावतात.

पुढे तो म्हणतो की, “आता वेळ आलेली आहे, जी सगळ्यांना महाराष्ट्राची वाघीण वाटते. पण तिच्याबाबत असे गॉसिप आहे विकास पाटील म्हणतात की, आता आपल्याला मीनलचा देखील पत्ता कट करावा लागणार आहे. हे ऐकून सगळेच हैराण होतात. मला एवढंच म्हणायचं आहे पोरांनो, पोरींनो विकास पाटीलसोबत असलेल्या सगळ्या स्पर्धकांनी सावध रहा कारण तुमचा पत्ता कधीही कट होऊ शकतो.”

हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य होते, परंतु विकास पाटील मात्र हसत असतो. शो संपत आलाय आणि हे मित्र असे भांडतात. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटत आहे की, ते शेवटपर्यंत एकत्र राहतील की नाही?

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!