Saturday, April 25, 2026
Home बॉलीवूड 2026 मधील हा वादग्रस्त चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज, पाहताच अंगावर येईल शहारा

2026 मधील हा वादग्रस्त चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज, पाहताच अंगावर येईल शहारा

‘द केरळ स्टोरी हा चित्रपट जितका गाजला तितकाच तो वादग्रस्त राहिला. तर या चित्रपटाचा दुसरा पार्ट हि गाजला होता आणि या चित्रपटावर अनेकांनी टिका हि केली मात्र आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा थ्रिलर ड्रामा 2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट लव्ह जिहाद या गोष्टीवर आधारित आहे.

‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर हा चित्रपट कामाख्या नारायण सिंग दिग्दर्शित आहे. आणि  निर्मिती अमृतलाल शाह यांनी केली आहे. हा चित्रपट 8 मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज  झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी 2’ हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. तर या चित्रपटाचे अनेक चाहते आता हा चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक आहेत आणि  ott वर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा राहील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाभोवतीच्या वादाबद्दल मिडियाशी बोलताना, निर्माते विपुल (vipul)अमृतलाल शाह म्हणाले, “‘केरळ स्टोरी 2’ च्या बाबतीत आमचा उद्देश नेहमीच कथाकथनाच्या पलीकडे जाऊन असे काहीतरी तयार करणे हा होता, जे लोकांना थांबायला, विचार करायला, त्यांच्या सभोवतालच्या वास्तवाबद्दल कठीण प्रश्न विचारायला भाग पाडेल. हे केवळ पडद्यावर चित्रित केलेल्या घटनांबद्दल नाही, तर त्यामागील सखोल कारणे समजून घेण्याबद्दल आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा

अरिजित सिंगला ह्या गाण्यामुळे मिळाली खरी ओळख; तर इम्रान हाश्मीच्या रोमांसने केली कमाल

हे देखील वाचा