टेलिव्हिजनवर अनेक शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यातील काही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यापैकीच एक शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ होय. या शोची लोकप्रियता पाहून या शोचे तिसरे पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शुक्रवारी (०८ ऑक्टोबर) या शोचा १५ वा दिवस आहे. बिग बॉसच्या घरात सुरू असलेले ‘जिंकू किंवा लढू’ हे साप्ताहिक कार्य संपले आहे. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम ए विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टनशिप पदाची उमेदवारी मिळणार आहे.
बिग बॉस यांनी घोषित केले की, या टीममधील सदस्यांनी विचारविनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टन्सीसाठी द्यावी. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये कॅप्टनशिप सोबतच खूप मोठी जबबाबदारी देखील येते. आता कॅप्टन बनण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे शुक्रवारच्या भागात कळेल. टीम ए मधील सदस्यांनी या विषयावर चर्चा करण्यास काल सुरूवात केली. प्रत्येक सदस्य आपण कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कसे योग्य आहेत आणि त्यांना इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले.
जयचे म्हणणे होते की, “मला उमेदवारी मिळाली पाहिजे.” तसेच मीराने सांगितले की, “मी माझंच नावं पुढे करेन.” दुसरीकडे विशालचे म्हणणे होते की, “कॅप्टन म्हणून मला निवडावं अशी विनंती आहे.” मात्र, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे टीम ए एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे. त्यामुळे आता ही संधी टीम बी ला मिळत आहे. टीम बी ला ही सुवर्णसंधीच मिळाली आहे.
आता टीम बी या संधीचा कसा योग्यपणे वापर करेल? कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे येतील? कोण बनेल पुढच्या आठवड्याचा कॅप्टन? हे शुक्रवारच्या भागात पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहू शकता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तिचे ऐकले नाही, तर तिचा तीळपापड होतो’, मीरा जगन्नाथबद्दल बिग बॉसच्या घरात चालू आहे गॉसिपिंग
-‘जो वापरेल बेड, त्याच्यावर पडेल रेड’, खेळात अपयश आल्यानंतरही ‘बिग बॉस मराठी’चे सदस्य बनलेत कवी
-उर्मिला कोठारेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात