Wednesday, July 3, 2024

शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच शिवचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डान्सर जुईली वैद्य हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शिव ठाकरेसोबत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने शिवला टॅग केले आहे. ते दोघेही ‘तौबा तुम्हारे ये इशारे’, या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. डान्समधील दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. (Bigg Boss Marathi fame shiv thakare’s dance video viral on social media)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शिवने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची पँट आणि पायात काळ्या रंगाचे शूज घातले आहेत. तसेच जुईलीने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि स्कर्ट घातला आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. त्या दोघांचा डान्स बघताना कोणाचीही नजर त्यांच्यावरून हटणार नाही.

त्यांच्या या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. त्यांचा डान्स एवढा सुंदर आहे की, तुम्ही देखील प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही. या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याने “टू क्लीन “अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री रॉय लक्ष्मी हिने फायर ईमोजी पोस्ट केली आहे. अशाप्रकारे बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

शिवने याआधी एमटीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीना जगतापचे अफेअर खूप गाजले होते. शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीनाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीनाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच वीनाने तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू देखील हटवला आहे.

या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे

-साप्ताहिक कार्यात मीराने मीनलला दिले ‘हे’ मोठे आव्हान, ऐकून सर्वच झाले स्तब्ध

-बिग बॉस मराठी: ‘जय वीरू’ची जोडी तुटणार? विशालने केले ‘असे’ कृत्य की, विकासला अनावर झाले अश्रू

हे देखील वाचा