Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bigg Boss OTT 2 Winner: एल्विश यादवने विजेतेपद पटकावत घडवला इतिहास, ट्रॉफीसोबत जिंकले ‘एवढे’ लाख

बिग बॉस ओटीटी 2‘ शोमधून मोठी बातमी समोर येत आहे. एल्विश यादव याने ‘बिग बॉस‘चे सिस्टम हलवले आहे. या शोला एल्विश यादव याच्या रूपात नवीन विजेता मिळाला आहे. विशेष म्हणजे, मागील 16 वर्षांमध्ये बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे, जेव्हा कोणत्याही वाईल्ड कार्ड स्पर्धकाने बिग बॉस विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. ही कामगिरी केल्यानंतर ‘एल्विश आर्मी’ आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा होत आहे. प्रत्येकजण जल्लोषात बुडाला आहे. सोशल मीडियावर चाहते एल्विशच्या विजयाचा जल्लोष करत आहेत.

एल्विशला मिळाले 25 लाख रुपये
युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याने ती कामगिरी करून दाखवली आहे, जी आजपर्यंत कुणालाच करता आली नव्हती. वाईल्ड कार्ड स्पर्धक बनून एल्विश यादव ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Elvish Yadav Bigg Boss OTT 2 winner) शोचा विजेता बनला आहे. एल्विशला विजयी करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी सर्व हद्द पार केली. एल्विशसोबतच त्याचे चाहतेही खूपच आनंदी आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेतेपद पटकावताच त्याच्यावर पैशांचा पाऊसही पडला आहे. विजेतेपदासाठी एल्विश यादवला 25 लाखांचे बक्षीस (Elvish Yadav Awarded 25 Lakhs) मिळाले आहे. तसेच, एक शानदार ट्रॉफीही मिळाली आहे.

उपविजेता कोण?
या शोचा ग्रँड फिनाले खूपच रंजक राहिला. सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) ग्रँड फिनालेत अभिषेक मल्हान (Abhishek Malhan) हा उपविजेता राहिला. तसेच, मनीषा राणी ही द्वितीय उपविजेती ठरली.

जबरदस्त राहिला बिग बॉसचा फिनाले
‘बिग बॉस ओटीटी 2’च्या अव्वल 3 स्पर्धकांमध्ये एल्विश यादव, मनीषा राणी आणि अभिषेक मल्हान आहे. शोचा ग्रँड फिनाले खूपच रंजक राहिला. शोमध्ये बादशाह आणि कृष्णा अभिषेक यांनीही हजेरी लावली. तसेच, महेश भट्टदेखील पूजा भट्टला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले. आयुषमान खुराना आणि अनन्या पांडेही ‘ड्रीम गर्ल 2’च्या प्रमोशनसाठी पोहोचले. शोमधील माजी स्पर्धकांनीही परफॉर्म केला. मनीषा राणीनेही आपल्या ठुमक्यांनी सर्वांना घायाळ केले. तसेच, एल्विश यादव याचा रावडी अंदाज सर्वांना पाहायला मिळाला.

कोण आहे एल्विश यादव?
‘बिग बॉस’ रिऍलिटी शोचे विजेतेपद पटकावणारा एल्विश हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. 24 वर्षांच्या वयात तो चाहत्यांमध्ये खूपच हिट आहे. गुरुग्राममध्ये जन्मलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव याने त्याची कारकीर्द 2016मध्ये सुरू केली होती. त्याचे 3 युट्यूब चॅनेल आहेत. एल्विशच्या हरियाणवी अंदाजामुळे तो तरुणांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. त्याला इंस्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोव्हर्सही आहेत.

शोमधील अव्वल 5 स्पर्धक
खरं तर, शोला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले. शोमध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक अभिनेते दिसले. तसेच, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनेही चांगलीच टक्कर दिली. त्यामुळेच शोमधील अव्वल 5 स्पर्धकांमध्ये 3 इन्फ्लुएन्सर्स एल्विश यादव, अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी यांनी जागा मिळवली. तसेच, अभिनेत्री बेबिका धुर्वे आणि पूजा भट्ट यांचाही अव्वल 5 स्पर्धकांमध्ये समावेश होता.

या शोमध्ये फलक नाज, अविनाश सचदेवा, आलिया सिद्दीकी, जिया शंकर, पुनीत कुमार, पलक पुरसवानी, आकांक्षा पुरी, जद हदीद यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. (bigg boss ott 2 2023 winner elvish yadav wild card entry know all here)

महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम फेरीपूर्वीच बिग बॉसमधील प्रेक्षकांचा लाडका स्पर्धक रुग्णालयात दाखल, चाहत्यांची काळजी वाढली
मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’

हे देखील वाचा