Sunday, October 1, 2023

‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सलमान खान दिसला धूम्रपान करताना? युजर्स म्हणाले, ‘सुसंस्कृत भाऊ…’

बिग बॉस ओटीटी 2‘ गेल्या काही दिवासांपासून चांगलाच चर्चेत आहे, पण आता या शोचा होस्ट सलमान खानही वादात सापडला आहे. खरं तर, गेल्या शनिवारी वीकेंड का वारमध्ये सलमान खानचा सिगारेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्विटरपासून रेडिटपर्यंत, युजर्स दावा करत आहेत की, सलमान खान होस्टिंग करताना सिगारेट ओढत होता आणि शोच्या एडिटिंग टीमच्या चुकीमुळे तो व्हायरल झाला. अशा परिस्थितीत सलमान खान ट्विटरवर चांगलाच चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस’ शोशी संबंधित बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बिग बॉस तक’ने सलमान खान (salman khan) याचे फोटो शेअर केले आहेत. त्यात म्हटले आहे की, “काल स्पर्धकांसोबत संवाद साधत असताना चुकून सलमान खान सिगारेट धरलेला एक शॉट समाविष्ट झाला. बिचाऱ्याचे काम तर गेले आता. फायर समाजा.”

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी सलमान खानवर निशाणा साधला. एका युजरने लिहिले की, ‘गेल्या आठवड्यातच सलमान खान आकांक्षा पुरी आणि जेडी हदीद यांना आपली संस्कृती समजावून सांगत होता. किस घेतल्याबद्दल ते त्याला शिव्या देत होते. आता काय करताय?’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही ढोंगी आहात हे आम्हाला माहीत आहे, पण तुम्ही इतरांना उपदेश करत असाल तर किमान त्यांच्यासमोर चांगले वागा.’ अशात एकाने लिहिले, ‘कालच्या एपिसोडमध्ये भावाचे डोळे खूप लाल झाले होते.’

काही लोकांनी सलमान खानच्या फोटोवर संशय व्यक्त केला आहे की, ही सिगारेट नसून पेपर आहे. अशात एका चाहत्याने लिहिले की, ‘अनेक लोक सिगारेट ओढतात, पण हा गुन्हा तर नाही. त्याचवेळी एका चाहत्याने हा पेपर असल्याचा दावा केला आहे.(bollywood actor salman khan smokes cigarette while host bigg boss ott season 2 live show fans says hypocrite)

अधिक वाचा-
कर्जाखीली दबूनही स्मृती इराणी यांनी का नाकारली पान मसाल्याची जाहिरात? समाेर आले माेठे कारण
साठ रुपयापासून करिअरला सुरुवात केलेले अलोकनाथ ‘असे’ बनले संस्कारी बापू

हे देखील वाचा