Saturday, June 29, 2024

दोन बायकांसोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये पोहोचला अरमान मलिक; उर्फी जावेद म्हणाली, ‘जर या तीन…’

यावेळी 16 स्पर्धकांनी ‘बिग बॉस OTT 3’ मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यामध्ये अनेक सोशल मीडिया इंफ्युएनसर आहेत. अभिनेता रणवीर शौरी देखील या शोचा एक भाग आहे. त्यांच्याशिवाय पत्रकार दीपक चौरसिया यांनाही या शोमध्ये सामील करण्यात आले आहे. शोदरम्यान दीपक आणि अरमान मलिकमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस ओटीटी नेहमीच चर्चेत असते. आता त्याचा तिसरा सीझनही चर्चेत आहे. सुरुवातीला शोचा होस्ट बदलल्याने चाहत्यांना धक्काच बसला. यावेळी सलमान खानच्या जागी अनिल कपूर शो होस्ट करत आहे. यानंतर, जेव्हा स्पर्धकांना शोमध्ये येण्याची वेळ आली तेव्हा अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह शोमध्ये आला. अरमान मलिकला पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. अरमान मलिकच्या दोन पत्नींसोबत या शोमध्ये सहभागी होण्यावर अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. आता उर्फी जावेदने या प्रकरणी आपले मत सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने अरमान मलिकच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अरमान मलिकचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अरमान त्याच्या दोन पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिकसोबत दिसत आहे. उर्फी जावेदने पोस्टमध्ये लिहिले की, “मी या कुटुंबाला काही काळापासून ओळखते. आणि मी हे निश्चितपणे सांगू शकते की हे मला भेटलेले सर्वात छान लोक आहेत. हे तिघे सुखी असतील तर त्यांना न्याय देणारे आम्ही कोण. बहुपत्नीत्वाची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे अजूनही काही धर्मांमध्ये लोकप्रिय आहे. त्या तिघांना काही अडचण नसती तर आम्हांला काही बोलायला कुणीच नसतं.”

अरमान मलिक हा YouTuber आहे. त्याला पायल आणि कृतिका या दोन बायका आहेत. एका मुलाखतीदरम्यान अरमानची दुसरी पत्नी कृतिका म्हणाली, “पायलसोबत माझी मैत्री २०१६ मध्ये झाली. काही वर्षांनंतर, त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले. माझी अरमानशी पहिली भेट याच पार्टीत झाली होती. आमची पहिली भेट झाली आणि आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. पहिल्या नजरेतल्या प्रेमासारखं. असेच एकमेकांना भेटायचे आमच्या नशिबी आले होते. भेटल्यानंतर 6-7 दिवसातच आमचे लग्न झाले. आमचा कोर्ट मॅरेज झाला होता.”

काल, टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने अरमान मलिक आपल्या दोन पत्नींसह शोमध्ये सामील झाल्याबद्दल तिची नाराजी व्यक्त केली होती. बिग बॉसमध्येही ती रागावलेली दिसली होती. त्याने पोस्टमध्ये विचारले होते की शोच्या लोकांची अशी काय मजबुरी होती की त्यांना (अरमान मलिक) शोमध्ये ठेवावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मलायका आणि अरबाजच्या लग्नात अर्जुन कपूर होता 13 वर्षाचा, फोटो पाहिला का?
भन्साळींसोबतच्या मतभेदांवर नाना पाटेकरांचे वक्तव्य; म्हणाले, ‘नाते कामापेक्षा जास्त असावेत’

हे देखील वाचा